पालखीत वारकऱ्यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त - राजाभाऊ चोपदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:28 AM2018-07-09T00:28:31+5:302018-07-09T00:28:53+5:30

वारक-यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त पाहायला मिळते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी समाजआरती होते. या वेळी चांदीचा चोप उंचावून आरोळी ठोकली की वारक-यांमध्ये नि:शब्द शांतता पसरते. हा चोपदाराचा नव्हे तर वारकरी माऊलींचा आदेश मानतात.

 Strong self-respect in the Palikar Warakaris - Rajabhau Chopdar | पालखीत वारकऱ्यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त - राजाभाऊ चोपदार

पालखीत वारकऱ्यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त - राजाभाऊ चोपदार

Next

वारक-यांमध्ये कमालीची स्वयंशिस्त पाहायला मिळते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी समाजआरती होते. या वेळी चांदीचा चोप उंचावून आरोळी ठोकली की वारक-यांमध्ये नि:शब्द शांतता पसरते. हा चोपदाराचा नव्हे तर वारकरी माऊलींचा आदेश मानतात. सूचनांचे तंतोतंत पालन केले जाते. वारीमध्ये विश्वास आणि श्रद्धा यांचा मेळ पाहायला मिळतो. त्यामुळेच पालखी एक आनंद सोहळा होतो. मोबाईल, फेसबुकमुळे वारीची सर्व माहिती अनेकांपर्यंत पोहोचते, त्यामुळे आबालवृद्ध उत्साहाने सहभागी होतात, असे संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले.

ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी पुण्यातील मुक्कामानंतर सोमवारी सकाळी सहा वाजता सासवडकडे मार्गस्थ होणार आहे. हडपसर, उरुळी देवाची, वडकीनाला, झेंडेवाडी या चार विसाव्यांनंतर दिवे घाटातील चढण चढून ती सासवडला पोहोचेल. मोबाईल, फेसबुकमुळे वारीची सर्व माहिती अनेकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे शहरातील अनेक लोक आळंदी ते पुणे किंवा पुणे ते सासवड या मार्गावर वारीमध्ये सामील होतात. विशेषत: ज्यांना आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये पूर्णपणे सामील होणे शक्य नसते, ते भाविक या मार्गांना पसंती देतात.
या मार्गांवर वारीत सहभागी होण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा लागेल, नोंदणी करावी लागेल का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. मात्र, कमी अंतरासाठी नोंदणी करावी लागत नाही. सलग आठ-दहा दिवस वारीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कोणत्याही दिंडीप्रमुखाशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे भोजन, निवास अशी व्यवस्था करणे सोपे जाते. शहरातील दिंडीप्रमुखांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा, असा प्रश्न पडतो. याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणे आवश्यक आहे. वारीमध्ये सुमारे तीन ते चार लाख लोक सहभागी होतात. शासनातर्फे यंदा ७०० शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. यामार्फत ३५ हजार लोकांची सोय होऊ शकते. मात्र, इतरांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीशी ग्रामीण भागातील लोक सहज जुळवून घेतात, मात्र शहरी नागरिकांची काहीशी अडचण होते. वारीत जेवणाची मात्र कधीच आबाळ होत नाही.
शासनाने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय जाहीर केला असल्याने वारीमध्येही त्यादृष्टीने जागर केला जात आहे. मात्र, बंदीप्रमाणेच शासनाने प्लॅस्टिकचे उत्पादनच बंद केले पाहिजे. प्लॅस्टिक ही सामान्य माणसाची दैनंदिन गरज बनली आहे. वारीमध्ये जेवणासाठी, पावसापासून बचाव करण्यासाठी, बसायला, झोपायला अंथरण्यासाठी प्लॅस्टिकचा उपयोग होतो. प्लॅस्टिकला पर्याय निर्माण झाल्यास वारीही प्लॅस्टिकमुक्त करणे शक्य होईल. याबाबत जागृती करणे आणि सकारात्मक दिशा देणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी ‘आम्ही वारकरी’ संस्थेच्या माध्यमातून वारकºयांना २० हजार पत्रावळींचे वाटप करण्यात आले आहे. वारीमध्ये आबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय आहे. आता ज्येष्ठांच्या बरोबरीने तरुणांची संख्याही वाढली आहे. तरुण चालताना कधी थकले, तर उत्साहात चालणारे वृद्ध पाहून त्यांना नवी उमेद मिळते. वारीबरोबर चालताना कोणताही थकवा जाणवत नाही, हे विशेष. दिवे घाटाची चढण चढून गेल्यावर सासवडला पोहोचले की अनेक स्वयंसेवी संस्था वारकºयांचे हात-पाय दाबून, मालिश करून सेवा करतात. वारकºयांमध्ये कमालीची स्वयंशिस्त पाहायला मिळते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी समाजआरती होते. या वेळी चांदीचा चोप उंचावून आरोळी ठोकली की वारकºयांमध्ये नि:शब्द शांतता पसरते. हा चोपदाराचा नव्हे तर वारकरी माऊलींचा आदेश मानतात. सूचनांचे तंतोतंत पालन केले जाते. वारीमध्ये विश्वास आणि श्रद्धा यांचा मेळ पाहायला मिळतो. त्यामुळेच पालखी सोहळा एक आनंद सोहळा होतो.
माणूस असो, की अश्व, त्याला योग्य आहार मिळणे गरजेचे असते. अश्वाला भाविक श्रद्धेने पेढे, बिस्कीट खाऊ घालतात. त्यामुळे ‘हिरा’ या अश्वाचे पोट फुगले. पुण्याला पोहोचेपर्यंत वारकºयांनी त्याच्याभोवती कडे केले होते, डॉक्टरांनीही त्याला तपासले. हिराने माऊलींना विनासायास पुण्यापर्यंत पोहोचवले.

Web Title:  Strong self-respect in the Palikar Warakaris - Rajabhau Chopdar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.