उपनगरात वादळी वारा व पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:22+5:302021-02-20T04:26:22+5:30
------------------------------------ अचानक सुटलेला वारा व पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली वानवडी : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गारांसह झालेल्या पावसात ...
------------------------------------
अचानक सुटलेला वारा व पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली
वानवडी : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गारांसह झालेल्या पावसात वानवडीतील रस्त्यावर पाण्याची तळी साचली. पाणी जाण्यासाठी असलेल्या पावसाळी चेंबरच्या झाकणांवरील पाणी जाण्यासाठी असणारी छिद्रे हिवाळ्यातील झाडांच्या पानगळतीमुळे पडलेल्या पालापाचोळ्यामुळे बंद झाली होती.
जोराच्या वाऱ्यासह पाऊस येत असल्याने वानवडीतील बहुतांश भागात विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे वर्क फाॅर्म होम सेवकवर्गाची चांगलीच फजिती होत होती. पाऊस पडणे थांबला होता, तरी विजेचा लपंडाव सुरूच होता.
रस्त्यावर तळी साचल्याने पाणी अंगावर येऊ नये म्हणून पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत होती. पाऊस जरी थांबला असला वातावरण ढागाळलेले झाले होते व हवेत गारवा होता.
------------------
वारज्यात हलका पाऊस
वारजे : वारजे, कर्वेनगर, शिवणे व उत्तमनगर परिसरात गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हलका पाऊस झाला. शहराच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात अत्यंत कमी पाऊस झाला. दुपारी चारच्या सुमारास जोराचा वारा सुटला होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर इतकी धूळ उडत होती की काही ठिकाणी वाहनचालकांना समोरचे दिसेनासे झाले. नंतर मात्र थोडा वेळच पाऊस पडला यामुळे रस्ते ओले झाले होते. संध्याकाळी पडलेल्या पावसाने वाहतुकीवर फारसा काही परिणाम झाला नसल्याची माहिती वारजे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बाबू शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. वारजे पेक्षाही उत्तमनगर, एनडीए भागात तुलनेने कमी पाऊस पडला आहे.
---------------
वडगाव शेरीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
चंदननगर:वडगाव शेरी, खराडी,चंदननगर,रामवाडी,कल्याणीनगर, विमाननगर या भागात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान,परिसरात ढगाळ वातावरणाची स्थिती उद्भवणार असून हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात पडला आहे. दरम्यान आज चार वाजल्यानंतर रामवाडी परिसरात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वडगाव शेरी परिसरातील रामवाडी या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला.