पाण्यासाठी पुन्हा पेटणार संघर्ष

By admin | Published: February 5, 2015 11:30 PM2015-02-05T23:30:25+5:302015-02-05T23:30:25+5:30

सुमारे ४ निविदा राज्य शासनाने रद्द केल्याने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Struggling to water again | पाण्यासाठी पुन्हा पेटणार संघर्ष

पाण्यासाठी पुन्हा पेटणार संघर्ष

Next

सुनील राऊत ल्ल पुणे
पुणे : जुना कालवा (बेबी कॅनॉल) दुरुस्तीसाठीच्या सुमारे ४ निविदा राज्य शासनाने रद्द केल्याने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शेतीसाठी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. हा कालवा ४५ वर्षे बंद अवस्थेत असून त्याला असंख्य ठिकाणी गळती तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे कालव्यातून सोडलेले पाणी शेतकऱ्यांना मिळणार की गळतीद्वारे वाया जाणार, याबाबत महापालिका आणि स्वत: पाटबंधारे विभागही संभ्रमात पडले आहेत.
खडकवासल्याच्या पाण्यावरून पुणे शहर व ग्रामीण यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. यावर उपाय म्हणून मध्यंतरी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहारातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून सुमारे साडेसहा टीएमसी पाणी शेतीला देण्याचा निर्णय झाला. हा प्रकल्प मार्चअखेरीस पूर्ण करून पाणी देण्याचे ठरले होते. मात्र, आता या कामासाठीच्या निविदाच राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
आघाडी शासनाच्या काळात राज्यातील सिंचन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाल्याने राज्य शासनाने राज्यातील तब्बल ६२४ कोटी २८ लाख रुपयांच्या सुमारे १२८ निविदा रद्द केल्या आहेत. या निविदांमध्ये खडकवासला प्रकल्पातील जुन्या आणि नव्या कालव्यांच्या दुरुस्तीच्याही सुमारे ८ निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागातील अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात महापालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या कॅनॉलच्या दुरुस्तीच्या सुमारे ८ ते १0 कोटी रुपयांच्या निविदांचा समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

४पालिकेकडून मुंढवा येथे बंधारा बांधण्यात आला असून, जॅक वेल उभारली जात आहे. हे पाणी या बांधातून उचलून सुमारे साडेतीन किलोमीटर लांब जलावाहिनीतून हडपसर येथून बेबी कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडले जाईल. हे काम ९0 टक्के पूर्ण झाले असून, त्यासाठी ९0 कोटींचा खर्चही झाला आहे. उर्वरित १0 टक्के काम मार्चअखेरीस पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.

पाटबंधारे विभागाची कोंडी
४शेतीसाठी पाणी सोडण्यात येणारा बेबी कॅनॉल (जुना कालवा) हा १८८५मध्ये खडकवासला धरण बांधल्यानंतर बांधण्यात आलेला आहे. १९६२मध्ये पानशेत धरण फुटल्यानंतर नवीन कालवा बांधण्यात आला. हा कालवा १९७0मध्ये सुरू झाल्यानंतर त्याच वेळी हा बेबी कॅनॉल बंद करण्यात आला. तो आजतागायत गेल्या ४५ वर्षांपासून बंदच आहे.
४त्यामुळे या कालव्याचे बांध अनेक ठिकाणी मातीसाठी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळतीची शक्यता आहे. तर, अनेक ठिकाणी त्यात भराव टाकून अतिक्रमणेही करण्यात आलेली आहे.
४महापालिकेकडून या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी त्याची दुरूस्ती पाटबंधारे विभागाकडून होणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने सिंचन विभागाने त्याच्या चार निविदा काढल्या होत्या. त्यांची रक्कम सुमारे ८ ते १0 कोटींची होती. मात्र, या निविदा आता रद्द झाल्याने ही दुरूस्ती होणे अशक्य आहे.

४महापालिकेने शेतीसाठी सांडपाणी सोडल्यानंतर पालिकेस पाटबंधारे विभाग १६.५0 टीएमसी पाणी देणार आहे. त्यामुळे
सिंचनाचे पाणी आपोआपच कमी होणार आहे. तर जे साडेसहा टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे, त्यातील केवळ अर्धा टीएमसी पाणी पुरेल एवढेच सिंचन क्षेत्र बेबी कॅनॉलवर आहे. त्यामुळे सहा टीएमसी पाण्याचा वापरच होणार नसल्याचे महापालिका तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी सांगतात.
४२0१२ पासून शहरासाठी १६.५0 टीएमसी पाणी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र,
पालिकेस जादा पाणी दिल्यास शेतीसाठीचे पाणी कमी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नदीत सोडलेले तब्बल साडेसहा टीएमसी सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

 

Web Title: Struggling to water again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.