एसटीच्या ‘रातराणी’ रिकाम्या; ट्रॅव्हल्स मात्र भरलेल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:31+5:302021-07-12T04:08:31+5:30
पुणे विभागाची रातराणी बंदच, रात्रीची शिवशाही, शिवनेरी देखील बंद पुणे : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटीसेवा आता हळुहळू पूर्वपदावर ...
पुणे विभागाची रातराणी बंदच, रात्रीची शिवशाही, शिवनेरी देखील बंद
पुणे : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटीसेवा आता हळुहळू पूर्वपदावर येत आहे. लालपरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र, राज्यातील अनेक शहरांत दुपारी चारनंतर निर्बंध लागत असल्याने एसटीची रात्रीची वाहतूक बंदच आहे. यात शिवनेरी, शिवशाहीसह रातराणीचा देखील समावेश आहे. अन्य विभागाच्या रातराणी रिकाम्या धावत आहे. ही परिस्थिती पाहून पुणे विभागाने आपली रातराणी सुरूच केली नाही.
पुणे विभागाने रातराणी बंदच ठेवली आहे. तर अन्य विभागाच्या ह्या प्रवाशांविना धावत आहे. दुसरीकडे ट्रॅव्हल्स मात्रला चांगला प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे, रातराणीच्या तुलनेने ट्रॅव्हल्सचे दर जास्त आहे. तरीदेखील प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करणे पसंत करीत आहे.
संध्याकाळी सात ते पहाटे पाच यादरम्यान रातराणी धावते. याचे दर लालपरीच्या तुलनेने जास्त आहे.तरी देखील याला प्रवाशाचा प्रतिसाद पूर्वी चांगला मिळत होता. विशेषतः मुंबई, सोलापूर व कोल्हापूर मार्गावर आता मात्र रातराणीची अवस्था बिकट आहे. ज्या काही रातराणी धावत आहे.त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.
बॉक्स 1
एकही स्लीपर शिवशाही नाही
पुणे विभागाच्या सहा साध्या सिटिंग शिवशाही धावत आहे. मात्र, एकही स्लीपर शिवशाही धावत नाही. स्लीपर शिवशाही बंदच आहे.
बॉक्स 2
जिल्ह्यात एसटी फेऱ्या किती :
पुणे विभागाच्या जिल्ह्यात सामन्यपणे 583 एसटी गाड्या धावत आहे. याच्या जवळपास 1500 फेऱ्या होत आहे. यातून सुमारे 51 हजार प्रवासी प्रवास करीत आहे.पुणे विभागाच्या जवळपास 1 हजार गाड्या आहेत. यात अन्य विभागाचे एक ते दोन गाड्या आहेत.
बॉक्स 3:
कोणत्या मार्गावर प्रतिसाद चांगला :
ज्या काही मोजक्या रातराणी धावत आहे.त्यांना पुणे - मुंबई, पुणे - सोलापूर व पुणे - कोल्हापूर आदी मार्गावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा मार्ग रातराणी सह सर्वच प्रकारच्या बस साठी चांगला आहे.उदा शिवशाही, लालपरी .
बॉक्स 4:
कोणत्या मार्गावर कमी प्रतिसाद :
पुणे विभागाने स्वतःची रातराणी बंद ठेवली आहे.मात्र ज्या अन्य विभागाच्या गाड्या पुण्यात येऊन पुढे जातात.अशामध्ये लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी शहरांना जाणाऱ्या रातराणी रिकाम्या जात आहे. सर्वांत कमी प्रतिसाद याच मार्गावर मिळत आहे.
बॉक्स 5:
ट्रॅव्हल्स कोणत्या मार्गावर जास्त प्रतिसाद :
पुण्याहून रात्रीच्या वेळी सुटणाऱ्या बहुतांश ट्रॅव्हल्सला सर्वच मार्गावर चांगला प्रतिसाद लाभत आहे.यात पुणे - कोल्हापूर, पुणे - सातारा ,पुणे -नाशिक,पुणे - मुंबई,पुणे - पणजी , पुणे - सोलापूर आदी मार्गावर चांगला प्रतिसाद आहे.
कोट
एसटी सेवेला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.मात्र रातराणी अपेक्षित असा प्रतिसाद नाही. त्यामुळे पुणे विभागाची रातराणी गाडी बंद आहे.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग.