उद्योगनगरीचा श्वास गुदमरतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 01:55 PM2019-08-27T13:55:02+5:302019-08-27T13:55:50+5:30
शहरातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत आहे. येथील कारखानदारीबरोबरच खासगी वाहनांचा वापरही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत...
- विश्वास मोरे-
पिंपरी : केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला असला तरी पर्यावरण रक्षणाकडे सत्ताधारी आणि प्रशासनास अपयश येत आहे. पाणी आणि हवा-वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष होत आहे. अर्थात स्मार्ट सिटीचा श्वास गुदमरतो आहे.
पिंपरी-चिंचवड हे शहर औद्योगिकनगरी म्हणून आशिया खंडात परिचित आहे. त्यामुळे याठिकाणी कामगार आणि कष्टकरी वर्गाचे वास्तव्य आहे. नागरिकीकरणाबरोबरच शहराचा विस्तारही होत आहे. दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने दुचाकी, चारचाकी वाहन वापराचे प्रमाण अधिक आहे. कारखानदारीमुळे नद्यांचा गळा घोटला जात आहे. तसेच परिवहन कार्यालयात दरवर्षी सुमारे दिड लाख वाहनांची नव्याने नोंद होत आहे. त्यामध्ये एक लाख दुचाकींचा समावेश आहे. वायू प्रदूषणाने स्मार्ट सिटीचा आता श्वास गुदमरत आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात काढला आहे. उपाययोजनांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
अधिक वाहनेच प्रदूषणाचे कारण
शहरातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत आहे. येथील कारखानदारीबरोबरच खासगी वाहनांचा वापरही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. दिवसाला दोनशे नवीन वाहनांची भर पडत आहे. गेल्या वर्षभरात हवेची गुणवत्ता अनेक वेळा वाईट ते अतिवाईट दरम्यान होती. त्यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाले आहेत.
प्रदूषणाची कारणे
वाहनांमध्ये जाळल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि वायू इंधनांमुळे वातावरणात सतत वायू मिसळला जात आहे. सतरा लाख वाहने रस्त्यावर आहे.
हवेत कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईडस, पार्टीक्युटेल मॅटर या घातक घटकांचा समावेश आहे.
पेट्रोलच्या मानाने डिझेल इंजिनातून बाहेर पडणाºया धुराची आणि पयायार्ने घातक घटकांची तीव्रता अधिक आहे.
हवेच्या नैसर्गिक टक्केवारीमध्ये बदल झाला आहे. पेट्रोल, डिझेल इंधनाच्या ज्वलनातून धुरावाटे गंधक वायू बाहेर पडतात.
* दृष्यपरिणाम
मानव, वनस्पती, प्राणी यांना भोगावा लागत आहे.
धुळीचे कण, झाडे, झुडपांमधील धूळ, वाहनांमधील जीवाश्म इंधने, औष्णिक उर्जा यातून
वायू प्रदूषण होऊन श्वसनाचे विकार वाढले.
कोळसा, पेट्रोलियम आणि आम्लवर्षा, इंधनाचा वापर, वाहनांमधून निघणाºया सल्फर आॅक्साइडमुळे कर्करोग, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी आदी आजार होतात.
वाहनांमधून निघणाºया धूरातील नायट्रोजन आॅक्साइडमुळे फुफ्फुसाचा दाह, जंतू
संसर्ग, श्वसनाचा अडथळा, छाती भरून येणे आदी विकार होतात.