तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकली सिताफळाची बी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 07:22 PM2018-08-16T19:22:26+5:302018-08-16T19:38:18+5:30

शिक्रापुर येथील एका तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत सिताफळाची बी अडकली होती.

Stuck in the respiratory system in Three-year boy | तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकली सिताफळाची बी

तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकली सिताफळाची बी

Next
ठळक मुद्देफुफ्फुसामध्ये उजव्या श्वास कमी पोहचत असल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास डॉक्टरांच्या पथकाने ब्रान्कोस्पोपी करून नलिकेत अडकलेली सिताफळाची बी काढली बाहेर

पुणे : तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकलेली सिताफळाची बी तर १५ वर्षीय मुलाच्या नाकात सहा वर्षांपूर्वी लाकडाचा तुकडा काढण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. दोन्ही घटनांमधील रुग्णांची स्थिती शस्त्रक्रियेनंतर स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
पहिल्या घटनेमध्ये शिक्रापुर येथील एका तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत सिताफळाची बी अडकली होती. तीन दिवसांपुर्वी सिताफळ  खाल्ल्यानंतर त्याला अचानक खोकला सुरू झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊनही हा खोकला कमी झाला नाही. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याच्या फुफ्फुसामध्ये उजव्या श्वास कमी पोहचत असल्याने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर छातीची क्ष-किरण तपासणी करण्यात आली तेव्हा श्वसन नलिकेत काही तरी अडकल्याचे दिसले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने ब्रान्कोस्पोपी करून नलिकेत अडकलेली सिताफळाची बी बाहेर काढली. या पथकामध्ये कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. समीर जोशी, डॉ. संजय सोनावणे, डॉ.अपुर्व वर्मा, डॉ. रुपाली बोरकर, डॉ. किर्ती कुंडलवाल यांचा समावेश होता. 
दुसऱ्या घटनेत मुळच्या नेपाळमधील १५ वर्षीय सुरज सावंत या मुलाच्या नाकात सहा वर्षांपुर्वी लाकडाचा तुकडा अडकला होता. तो झाडावरून खाली पडल्याने लाकडाचा तुकडा डाव्या डोळ्याला छेद देऊन त्याच्यानाकात अडकला. स्थानिक रुग्मालयात डोळ्यातील तुकडा काढण्यात आला. पण सहा वर्ष उपचार घेऊनही त्याचा त्रास कमी झाला नाही. ससून रुग्णालयात आल्यानंतर त्याच्या नाकाचे सी.टी. स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये ८ सेंटीमीटर लांबीचा लाकडाचा तुकडा नाकात अडकल्याचे निदर्शनास आले. एंडोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे हा तुकडा बाहेर काढण्यात आला. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. समीर जोशी, डॉ. राहुल ठाकूर, डॉ. गुनित कौर, डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. प्राजक्ता तायडे यांच्या पथकाने शस्त्रक्रियेत सहभाग घेतला.

Web Title: Stuck in the respiratory system in Three-year boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.