गणिताचे विद्यार्थीप्रिय अध्यापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:05+5:302021-05-30T04:10:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणिताचे विद्याार्थीप्रिय अध्यापक डॉ. श्रीनिवास गुरुराज उडपीकर (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणिताचे विद्याार्थीप्रिय अध्यापक डॉ. श्रीनिवास गुरुराज उडपीकर (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. पूना बोर्डिंग हाऊसचे संस्थापक स्वर्गीय गुरुराज उडपीकर यांचे श्रीनिवास हे पुत्र होत.
वडिलांच्या निधनानंतर पूना बोर्डिंग हाऊसचे कामकाज पाहतानाच श्रीनिवास यांनी शिक्षण पूर्ण केले. गणित या विषयाची आवड असलेल्या उडपीकर यांनी स. प. महाविद्याालयामध्ये अध्यापन कार्य सुरू केले. जागतिक कीर्तीचे गणिततज्ज्ञ आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक स्वर्गीय डॉ. श्रीराम अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९९० मध्ये त्यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठाकडून गणित विषयामध्ये पीएच. डी. संपादन केली होती. २००० मध्ये ते सेवानिवृत्त झाले असले, तरी अखेरपर्यंत ते पूना बोर्डिंग हाऊसमध्ये कार्यरत होते.
.....................................