एक रायटर, एक सुपरवायझर... 'तो' बारावीची परीक्षा देतोय चारचाकीतून....! कारणही तसंच आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:31 PM2022-03-04T18:31:21+5:302022-03-04T18:34:09+5:30
एक विद्यार्थी देतोय चारचाकीतून परीक्षा...
सोमेश्वरनगर (पुणे) :बारामती तालुक्यातील काकडे महाविद्यालयातील विद्यार्थी अवधूत शंकर ठोंबरे हा चक्क चारचाकीतून बारावीची परीक्षा देत आहे. त्याला कारणही तसे आहे. आज बारावीची परीक्षा सुरू झाली. यामध्ये काकडे महाविद्यालयातुन एकूण ५२० विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. मात्र यातील एक विद्यार्थी अवधूत ठोंबरे हा चक्क आपल्या चारचाकीतून बारावीचे पेपर सोडवत आहे.
यासाठी काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी त्या विद्यार्थ्याला चारचाकीतून परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. एवढंच काय त्याला एक पेपर लिहणार रायटर व एका सुपरवायझरची देखील सोय केली आहे
अवधूत ठोंबरे याचा चार दिवसांपूर्वी नीरा नजीक पिंपरे या ठिकाणी अपघात झाला होता. मध्ये त्याला पायाला गंभीर दुखापत झाली असून तो सध्या झोपूनच आहे. मात्र परीक्षा देण्याची त्याची इच्छाशक्ती पाहून त्याला परीक्षा केंद्राने चारचाकीतून पेपर सोडवण्याची परवानगी दिली आहे.