गुरुजीकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल, कोळगाव येथे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 21:45 IST2025-02-25T21:45:23+5:302025-02-25T21:45:49+5:30
Pune News: शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे शिक्षकानेच चौथीत शिकत असलेल्या अल्पवयीन एका विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला आहे. सा संशयित शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुजीकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, पोस्कोचा गुन्हा दाखल, कोळगाव येथे प्रकार
शिरूर - तालुक्यातील कोळगाव डोळस येथे शिक्षकानेच चौथीत शिकत असलेल्या अल्पवयीन एका विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला आहे. सा संशयित शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवार (दि.२२) रोजी घडली आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बाळासाहेब धोंडीबा गुंजाळ (वय ४५, ता.शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नव आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळगाव डोळस येथील शाळेत शिक्षक बाळासाहेब धोंडीबा गुंजाळ हा अध्यापनाचे काम करीत आहे. तो चौथीत शिकणाऱ्या मुलींना वर्ग झाडून काढण्यास तसेच इतर कामे सांगत असे. मुली वर्ग झडताना तो त्यांच्याशी गैरकृत्य करीत होता. असे प्रकार त्याने अनेक वेळा केला आहे. तो मुलीला पट्ट्याने मारण्याची व जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे सदर पीडित मुलगी शाळेत जाण्यास घाबरत होती. पालकांनी विश्वासात घेत विचारपूस केल्याने तीने सर्व प्रकार सांगितला आहे. यामुळे संतपत पालकांनी शाळेला टाळे ठोकत शिक्षकाला चोप दिला. तसेच गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.
शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली असुन चौकशी अंती निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.