विद्यार्थी-पालकांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Published: July 27, 2016 04:19 AM2016-07-27T04:19:57+5:302016-07-27T04:19:57+5:30
गुणवत्ता असूनही अकरावीला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या
पुणे : गुणवत्ता असूनही अकरावीला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या मदतीने या आंदोलनावर नियंत्रण मिळवावे लागले. विद्यार्थी-पालकांच्या तक्रारींवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही दुय्यम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर, पुढील प्रवेशप्रक्रियेत आत्तापर्यंत कॉलेजनिश्चिती न मिळालेल्या, दूरचे कॉलेज मिळालेल्या, नॉट रिपोर्टेड राहिलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केल्याचे दिसते. त्याचवेळी प्रक्रियेतील त्रुटींमुळे बेटरमेंट मिळाल्यानंतरही तुलनेने दुय्यम कॉलेजमध्ये प्रवेशनिश्चिती करण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील टप्प्यांमध्ये विचार करण्यात आलेला नाही, अशी नाराजी विद्यार्थी-पालकांनी व्यक्त केली. ठिय्या आंदोलनातील विद्यार्थी-पालक आक्रमक झाल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवावे लागले. या वेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.