पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:15 PM2022-09-20T18:15:11+5:302022-09-20T18:15:17+5:30

मागील काही दिवसांपासून तरुण निराशात होता

student preparing for a competitive exam in Pune | पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्रिभुवन विठ्ठल कावले (वय ३०, रा. गांजवे चौक, मूळ रा. जालना) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्रिभुवन कावले हा मूळचा जालना येथील आहे. तो गांजवे चौकात कॉट बेसीसवर जानेवारी २०२१ पासून मित्रासोबत राहत होता. तसेच तो राज्यसेवा परीक्षेची तयारी करत होता.

मंगळवारी दुपारी त्याचे मित्र जेव्हा ते राहत असलेल्या ठिकाणी गेले असता आतून दरवाजा बंद असून दरवाजा कोणीही आवाज देऊनही त्रिभुवन दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेवटी दरवाजा तोडून रूममध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांना त्रिभुवन पंख्याला गळफास घेतल्याचे आढळून त्याच्या सहकारी मित्रांनी लागलीच याची माहिती पोलिसांना दिली. 

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. आत्महत्या करण्यापूर्वी त्रिभुवन याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात नैराश्यातून आपण हे पाऊल उचलले असून, याला कोणी जबाबदार नाही, असे चिठ्ठीत नमूद आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: student preparing for a competitive exam in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.