'अाम्ही काय वाचायचं हे तुम्ही नाही सांगायचं' असं म्हणत विद्यार्थ्यांचा विद्यापीठात माेर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 01:17 PM2018-12-10T13:17:34+5:302018-12-10T13:20:39+5:30
अाम्ही काय वाचायचं हे तुम्ही नाही सांगायचं असं म्हणत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये माेर्चा काढला हाेता.
पुणे : संविधान दिनी अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) कडून हरिती प्रकाशनने विद्यापीठात लावलेल्या पुस्तकांच्या स्टाॅलवरुन अभाविप अाणि एनएसयुअाय च्या वादानंतर अाम्ही काय वाचायचं हे तुम्ही नाही सांगायचं असं म्हणत फुले, शाहू, अांबेडकर कृती समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माेर्चा काढण्यात अाला. यावेळी विद्यार्थ्यांसह, माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील, कम्युनिस्ट पक्षाच्या किरण माेघे अादी उपस्थित हाेते. पाेलिसांनी या माेर्चाला परवानगी नाकारली हाेती. माेठा पाेलीस बंदाेबस्त यावेळी तैनात करण्यात अाला हाेता.
संविधान दिनी 26 नाेव्हेंबर राेजी हरिती प्रकाशनाकडून विद्यापीठाच्या अनिकेत कॅंन्टिन जवळ पुस्तकांचा स्टाॅल लावण्यात अाला हाेता. या स्टाॅलवर महापुरुषांवर लिहीण्यात अालेली विविध पुस्तके हाेती. या स्टाॅलवर अाक्षेप घेत शहरी नक्षलवादाचे समर्थन करणारी पुस्तके विकत असल्याचा अाराेप अभाविपकडून करण्यात अाला. त्याचबराेबर हरिती प्रकाशनाच्या लाेकांना धक्काबुक्की देखिल करण्यात अाली. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. या घटनेचा निषेध म्हणून अाज विद्यापीठातील अांबेडकर पुतळ्यापासून अनिकेत कॅंन्टिनपर्यंत माेर्चा काढण्यात अाला. या माेर्चात विविध घाेषणा देण्यात अाल्या. तसेच लाेकशाही व संविधानाचा जयजयकार करण्यात अाला.
यावेळी बाेलताना बी. जी काेळसे पाटील म्हणाले, देशात अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांएेवजी राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात अाहे. एल्गार परिषदेचा भीमा काेरेगाव हिंसाचाराशी संबंध नाही असे पाेलीस सांगत असताना भिडे, एकबाेटेंना वाचविण्यासाठी सरकार एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांचा माअाेवादाशी संबंध जाेडत अाहे. देशात सध्या तरुणांना नाेकऱ्या नाहीत, स्पर्धा परीक्षांच्या जागा भरल्या जात नाहीत. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घराघरात जाऊन लाेकांचे प्रबाेधन केले पाहीजे. सरकार जनतेशी कशाप्रकारे दिशाभूल करते अाहे हे लाेकांना सांगायला हवे.
किरण माेघे यांनी 26 नाेव्हेंबर राेजी घडलेल्या घटनेचा निषेध केला. तसेच विद्यार्थी शासनाला प्रश्न विचारतात ते शासनाला नकाे अाहे, त्यामुळे विद्यापीठांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले अाहे. संविधानाला गाेळवलकरांच्या बंच अाॅफ थाॅट्सने रिप्लेस करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचा अाराेपही त्यांनी यावेळी केला. हरिती प्रशाशनाचे श्याम घुगे म्हणाले, संविधान दिनीजी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा माेर्चा काढण्यात अाला अाहे. 26 तारखेला घडलेल्या घटनेमुळे महामानवांचे साहित्य वाचायचे की नाही असा प्रश्न अाम्हाला पडला अाहे. अशी झुंडशाही किती दिवस हाेत राहणार. त्यामुळे यासाठी एकत्र येत निषेध करुन इथली जी धर्मांध व्यवस्था अाहे तिला ताेडीस काढण्यासाठी हा माेर्चा अाम्ही काढला अाहे.