इंदापूर तालुक्यात आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:13 PM2018-08-24T16:13:47+5:302018-08-24T16:21:29+5:30

दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता.

student sucide reason for no money for entry of ITI at Indapur taluka | इंदापूर तालुक्यात आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास

इंदापूर तालुक्यात आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसातील आत्महत्येची दुसरी घटना

भिगवण : आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याच्या कारणाने  १८ वर्षाच्या तरुणाने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना मदनवाडी येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास घडली. याच आठवड्यात दुसऱ्या तरुणाने आत्महत्येचा मार्ग निवडल्याने परिसरातील पालकांनी हळहळ व्यक्त करतानाच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.
भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  चिंतामणी नाना सोनावणे (रा. मदनवाडी) यांनी याबाबत खबर दिली आहे.  त्यांचा भाचा साईनाथ राजेंद्र पोपळघट (वय १८) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता. गेल्या आठवड्यापासून साईनाथ हा आपले मामा आणि आई यांना शाळेची फी भरण्यासाठी पैशाची मागणी करत होता. मामाच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आणि आई पुणे येथे धुण्याभांड्याची कामे करून उदरनिर्वाह करत असल्यामुळे आपणाकडे फी देण्याइतके पैसे जमा झाली कि लगेच फी भरू, असे सांगत आठवडा लोटल्यानंतर हि पैसे न मिळाल्याने अखेर साईनाथ याने असे टोकाचे पाऊल उचलले, अशी  माहिती समोर येत आहे. याच  आठवड्यात गिरीष संजय गरगडे २० विहिरीत मदनवाडी-बारामती रस्त्यावरील ढवळे यांच्या विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविल्याची घटना ताजी असतानाच आज घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य संजय देहाडे यांनी सांगितले की,  मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे आजची तरुण पिढी एकलकोंडी आणि चिडचिड्या स्वभावाची बनत चालली आहे.  त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्याच्या परिणामाची फिकीर न करता आतातायी निर्णय घेतले जातात. तर आजच्या तरुणांना शाळेतून तसेच समाजातूनही समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. 

Web Title: student sucide reason for no money for entry of ITI at Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.