पुण्यातील FTII च्या बॉईज हॉस्टेलमध्ये विदयार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 10:35 AM2022-08-05T10:35:17+5:302022-08-05T12:11:42+5:30
घटनास्थळी डेक्कन पोलीस, फायर ब्रिगेड व ऍम्ब्युलन्स दाखल
पुणे : पुण्यातील एफटीआयआयच्या बॉईज हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्विन शुक्ला (रा गोवा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बॉयज हॉस्टेल एफटीआयआय मधील S12 B block रूमचा आतून दरवाजा लॉक करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी डेक्कन पोलीस, फायर ब्रिगेड व ऍम्ब्युलन्स दाखल झाले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.