शुल्कासाठी विद्यार्थ्यांना सक्ती नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:52 AM2017-08-06T04:52:08+5:302017-08-06T04:52:23+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमात राखीव संवर्गातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करू नये. तसेच या शुल्काअभावी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशही नाकारता येणार नाही
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमात राखीव संवर्गातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करू नये. तसेच या शुल्काअभावी संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशही नाकारता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयांकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. शुल्क न भरल्यास प्रवेश रद्द करण्याचा इशाराही त्यांना दिला जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले होते. यावर आरक्षण हक्क संरक्षण समिती व दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारुनये याबाबत पाठपुरावा केला होता.