बारामतीत विद्यार्थ्यांचे बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 04:32 AM2017-08-16T04:32:49+5:302017-08-16T04:32:52+5:30
बारामतीत गेल्या दोन वर्षांपासून शालेय गणवेश दिले नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले.
बारामती : बारामतीत गेल्या दोन वर्षांपासून शालेय गणवेश दिले नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले. बारामती नगर परिषदेसमोर झालेल्या या बोंबाबोंब आंदोलनातून विद्यार्थ्यांनी नगराध्यक्षांसह नगर परिषदेच्या पदाधिकाºयांना जाब विचारला. गेल्या दोन वर्षांपासून बारामती नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश आणि अन्य शालेय साहित्य दिले जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.
दोन वर्षांपासून निधीची तरतूद असताना आणि प्रशासकीय मंजुरी असताना गरीब विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर साहित्य दिले जात नव्हते. त्यामुळे मंगळवारी विद्यार्थ्यांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरच नगर परिषदेच्या पदाधिकाºयांना रोखून धरले.
स्वातंत्र्य दिनी झालेल्या या अनोख्या आंदोलनामुळे पदाधिकारी आणि प्रशासनाची धांदल उडाली. येत्या दहा दिवसांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना गणवेश व अन्य साहित्य देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.