शांततेच्या मार्गाने आंदाेलन करण्याचे शिक्षण विद्यापीठांमधून देणे गरजेचे : राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:24 PM2020-01-09T16:24:35+5:302020-01-09T16:33:24+5:30
विदयार्थ्यांना शांततेच्या मार्गाने आंदाेलन करण्याचे शिक्षण विद्यापीठांमधून दिले गेले पाहिजे असे मत राज्यपालांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.
पुणे : सार्वजनिक संपत्तीचे नुकसान हाेऊ न देता शांततेच्या मार्गाने आंदाेलन हाेणे गरजेचे आहे. असे शिक्षण विद्यार्थ्यांना विद्यापीठांमधून देणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र यांच्यातर्फे आयाेजित 9 व्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
यावेळी पुण्याचे महापाैर मुरलीधर माेहळ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड, संगणक तज्ञ डाॅ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड उपस्थित हाेते.
आम्हाला माेकळेपणाने बाेलू द्या..विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे मागणी
काेश्यारी म्हणाले, “जेव्हा आम्ही एकमेकांची गोष्ट मान्य करू, तेव्हाच या विश्वात शांतता निर्माण होईल फिट इंडियासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज समाजातील मत भिन्नतेमुळे शांती निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे शिक्षण देणे गरजेचे आहे, की ज्यामुळे सरकारी संपत्तीचे नुकसान होणार नाही. विश्व शांतीसाठी सर्वप्रथम आत्मज्ञान होणे गरजेचे आहे. समाज एकत्रित आणण्यासाठी या देशात गणेशोत्सवाची सुरूवात झाली होती. पण, आज याची स्थिती वेगळी झाली आहे. या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने जे नऊरत्न शोधले त्यामुळे नक्कीच येथील विद्यार्थी हा नवरत्नसारखा बनेल. लिबरल त्यांना म्हणतो जो सर्वांना सोबत घेऊन जवळ करतो. पीस केव्हा येईल जेव्हा आम्ही एकदुसर्यांची गोष्ट मान्य करू. वेळेनुसार काही मापदंड ठेवणे गरजेचे आहे. दुसर्यांचा आदर कराण्याची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळावी. ”