कृषी सेवक भरतीत बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:37 PM2018-04-04T15:37:01+5:302018-04-04T15:37:01+5:30

राज्यात सध्या कृषी सेवक भरती प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद विभागातील लेखी परीक्षेनंतर यातील एका विद्यार्थ्याकडील या विद्यापीठाच्या पदवीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

Students of Bogus University in the recruitment of Agricultural Servants | कृषी सेवक भरतीत बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी

कृषी सेवक भरतीत बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी

Next
ठळक मुद्देचारही कृषी विद्यापीठांच्या अधिष्ठातांना (कृषी) या विद्यालयांची माहिती घेण्याबाबत आदेशराज्यात केवळ चारच कृषी विद्यापीठे अधिकृत

पुणे : राज्यात सुरू असलेल्या कृषी सेवक भरती प्रक्रियेत बोगस विद्यापीठाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद विभागातील लेखी परीक्षेनंतर यातील एका विद्यार्थ्याकडील या विद्यापीठाच्या पदवीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत विभागीय कृषी सहसंचालकांनी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून माहिती मागविली आहे. हे विद्यापीठ बोगस असल्याचे परिषदेने यापुर्वीच जाहीर केले आहे. 
राज्यात सध्या कृषी सेवक भरती प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद विभागातील भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा पार पडली असून पात्र उमेदवारांची निवडही करण्यात आली आहे. या निवडप्रक्रियेमध्ये एका विद्यार्थ्याने सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाची पदविका घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी विभागीय कृशी सहसंचालकांनी संबंधित विद्यापीठाला मान्यतेबाबत विचारणा केली होती. त्यावर विद्यापीठाने या पदविकेला मान्यता मिळाल्याचे कळविले. तशी कागदपत्रेही सादर केली आहे. मात्र, याबाबत साशंकता निर्माण झाल्याने सहसंचालकांनी कृषी परिषदेकडे प्रस्ताव पाठवून या विद्यापीठाबाबत माहिती मागविली आहे. 
याविषयी माहिती देताना परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे १९८३ या कायद्यानुसार राज्यात केवळ चारच कृषी विद्यापीठे अधिकृत आहेत. या विद्यापीठांव्यतिरिक्त कृषी अभ्यासक्रम राबविण्यास इतर कोणत्याही विद्यापीठाला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ हे अनधिकृत आहे. या विद्यापीठात राज्यात ठिकठिकाणी विविध विद्यालयेही आहेत. त्याना कृषी परिषद किंवा चारही विद्यापीठांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे ही विद्यालये आणि त्यांनी दिलेली पदवीही अनधिकृत ठरते. परिणामी कोणत्याही नोकरीसाठी ही पदवी ग्राह्य धरली जाणार नाही. राज्यात या विद्यापीठामध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, याबाबत परिषदेकडे अद्याप आकडेवारी उपलब्ध नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय मागासवर्ग कृषी विद्यालये, माहिती व तंत्रज्ञान विद्यालय या नावाने सुमारे ६२ विद्यालये सुरू केल्याची माहिती परिषदेकडे आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यालये सोलापूर जिल्हयात २३ आहेत. तसेच पुणे, ठाणे, कोल्हापुर, सांगली, जळगाव, धुळे, लातूर, बीड, बुलढाणा, सांगली, ठाणे, अकोला, परभणी, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्येही ही विद्यालये सुरू आहेत. याबाबतची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. चारही कृषी विद्यापीठांच्या अधिष्ठातांना (कृषी) या विद्यालयांची माहिती घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या विद्यालयांचा शोध घेऊन तेथील विद्यार्थ्यांची संख्या व इतर माहितीचा अहवाल तयार करण्यात करण्यास सांगण्यात आले आहे.

.............

हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
अनधिकृत विद्यापीठ मागील दोन वर्षापासून सुरू असून संलग्न विद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. कृषी सेवक भरतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच या विद्यापीठाची पदवी समोर आली आहे. विद्यापीठातून पदविका अभ्यासक्रमाची पहिलीच तुकडी बाहेर पडल्याने यावर्षी विविध अभ्यासक्रम तसेच शासकीय व खासगी नोकºयांमध्ये हे विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे. तसेच कृषी भरतीतही आणखी काही विद्यार्थी असू शकतात. मात्र, हे विद्यापीठच अनधिकृत असल्याने या विद्यार्थ्यांची पदवी ग्राह्य धरली जाणार नाही. 
- डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक (शिक्षण)
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
-----------

Web Title: Students of Bogus University in the recruitment of Agricultural Servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.