विद्यार्थ्यांनी केली शिवनेरी किल्ल्याची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:38+5:302021-02-25T04:10:38+5:30
अविघटनशील कचऱ्याने शिवनेरी परिसर अस्वच्छ होण्याबरोबरच पर्यावरणाचीसुद्धा मोठी हानी होत असल्याने या विद्यार्थ्यांकडून शिवनेरी किल्ला परिसर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन ...
अविघटनशील कचऱ्याने शिवनेरी परिसर अस्वच्छ होण्याबरोबरच पर्यावरणाचीसुद्धा मोठी हानी होत असल्याने या विद्यार्थ्यांकडून शिवनेरी किल्ला परिसर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी कडेलोट परिसर, शिवजन्मभूमी परिसर, शिवकुंज, शिवकालीन गंगा-यमुना ही पाण्याची टाके, शिवाईदेवी मंदिर तसेच किल्ल्यावर इतरत्र पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाऊची रिकामी पाकिटे, प्लॅस्टिकच्या पिशव्या तसेच अन्य कचरा गोळा केला. यावेळी सुमारे दहा ते बारा गोणी भरून कचरा गोळा गडावरून खाली आणण्यात आला. हा कचरा जुन्नर नगरपालिकेच्या कचरा वाहतूक गाडीतून कचरा डेपोत नेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास दौंडकर, प्रा. संदीप ढोकणे, प्रा. कैलास जाधव, प्रा. अनिल निघोट, संतोष गाडेकर, राजेंद्र बुट्टे पाटील ,नगरसेवक भाऊसोा कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गणेश सूर्यवंशी, मराठा सेवा संघाचे जुन्नर शहर अध्यक्ष मंदार बुट्टे पाटील यांनी योगदान दिले.
शिवनेरी किल्ला परिसर स्वच्छता उपक्रमात सहभागी विद्यार्थी.