स्पर्धा परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:42+5:302021-07-05T04:08:42+5:30
: केडगाव तालुका दौंड येथील स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. ...
:
केडगाव तालुका दौंड येथील स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. यामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्वप्निल हा मूळचा केडगाव येथील रहिवाशी होता. त्याचे चुलते केडगाव येथील रहिवासी आहेत. त्याचे कुटुंब हडपसर येथे राहण्यासाठी राहण्यासाठी गेले होते. हडपसर येथील राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. २०१९ मध्ये एमपीएससीची पूर्वपरीक्षा पास झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना पार्श्वभूमीवर परीक्षा होत नसल्याने कंटाळून नैराश्यातून स्वप्नीलने वरील निर्णय घेतला. यासंदर्भात स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. स्वप्नीलच्या आईने शासनाच्या नाकर्तेपणामुळे स्वप्निल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप लावला आहे. स्वप्निलचे शिक्षणासाठी कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. त्यामुळे स्वप्निल तणावांमध्ये होता. गेली दोन वर्षांपासून तो नोकरीची वाट पाहत होता. परंतु या काळामध्ये कसली परीक्षा न झाल्याने स्वप्निल वरील निर्णय घेतला. यासंदर्भात स्वप्निलची बहीण म्हणाली, स्वप्निलचे कलेक्टर होण्याचे स्वप्न होते. दहावीमध्ये तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. बारावीमध्ये ८२ टक्के गुण पडले होते. इंजिनीयर डिस्टिंक्शनने पास झाला होता. भविष्यामध्ये त्याला मोठा अधिकारी व्हायचे होते, परंतु परीक्षा न झाल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला.