खेड तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या मृत्यूने विद्यार्थी व्याकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:08+5:302021-04-21T04:11:08+5:30
जवाहरलाल विद्यालय चास येथील आनंद बोंबले, मामासाहेब मोहोळ प्रशाला वाशेरे येथील कांतिलाल बनकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील साधना सुभाष ...
जवाहरलाल विद्यालय चास येथील आनंद बोंबले, मामासाहेब मोहोळ प्रशाला वाशेरे येथील कांतिलाल बनकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील साधना सुभाष जैद, सिद्धेश्वर विद्यालय, वेताळे शाळेचे योगेश लोखंडे व इतर शिक्षकांना, सेवकांना नाईलाजाने श्रध्दांजली वाहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. कोविडमुळे शिक्षणाची वाताहत निर्माण झाली असताना ती भरून काढणारे आदर्श आणि हुशार शिक्षक सुध्दा देवाघरी जात असल्याने विद्यार्थ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे.
मास्क, सॅनिटायझरचा प्रभावी वापर करून सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे. विद्यार्थी परीक्षा विना पास करून पुढच्या वर्गात घालावे लागलेत. शेतकऱ्यांच्या पिकांना बाजारभाव मिळत नाही. घराबाहेर पडता येत नाही. लसीकरणाची वाट पहावी लागते. यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. काम नाही की आराम नाही. आलेल्या संकटाला तोड द्यावे लागत आहे.
यासर्व परिस्थितही शिक्षक ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून एकीकडे कर्तव्य बजावत असताना दुसरीकडे कोविड लसीकरण केंद्रावर ड्युटी, कोविड कुटुंब सर्वेक्षण, कोविडबाबत जनजागृती करत सामाजिक दातृत्व प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत आहेत.