विद्यार्थ्यांनो अपयशाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:09 AM2021-07-27T04:09:56+5:302021-07-27T04:09:56+5:30
बारामती : विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचून जाऊ नका. सकारात्मक विचारधारा असणारा मित्रपरिवार सोबत असू द्या. ध्येय निश्चित झाले की योग्य ...
बारामती : विद्यार्थ्यांनो, अपयशाने खचून जाऊ नका. सकारात्मक विचारधारा असणारा मित्रपरिवार सोबत असू द्या. ध्येय निश्चित झाले की योग्य अभ्यास व नियोजन यश मिळवून देते,अशा शब्दांत फ्लाइंग लेफ्टनंट सुजय यादव यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मंत्र दिला.
फ्लाइंग लेफ्टनंट पदावर कार्यरत असणारे बारामतीचे सुपुत्र यादव यांनी ट्रिक्स अभ्यासिकेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना विद्यार्थ्यांना त्यांनी स्वत:चा परीक्षा उत्तीर्ण ते मुलाखत व नियुक्तीचा प्रवास उलगडून सांगितला. तसेच मुलांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले. तसेच विद्यार्थ्यांना भावी अधिकारी बनण्यासाठी धडे दिले.
सुजय यादव बारामतीकर आहेत. ते वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत. यानिमित्त अभ्यासिकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राणी बिनवडे यांनी केले. तर आभार रोहिदास बिनवडे यांनी मानले.