विद्यार्थ्यांनी शोधले वाहतूककोंडीवरचे उपाय..!

By admin | Published: February 22, 2016 04:05 AM2016-02-22T04:05:37+5:302016-02-22T04:05:37+5:30

पुण्याच्या वाहतूककोंडीवर उपाययोजना शोधताना हात टेकलेल्या यंत्रणांना शाळकरी विद्यार्थ्यांनी मात्र काही ठोस उपाययोजना सुचवल्या. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी काही स्वयंसेवी

Students find solutions for traffic! | विद्यार्थ्यांनी शोधले वाहतूककोंडीवरचे उपाय..!

विद्यार्थ्यांनी शोधले वाहतूककोंडीवरचे उपाय..!

Next

पुणे : पुण्याच्या वाहतूककोंडीवर उपाययोजना शोधताना हात टेकलेल्या यंत्रणांना शाळकरी विद्यार्थ्यांनी मात्र काही ठोस उपाययोजना सुचवल्या. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या वाहतूक नियोजनावरील मॉडेल्स सादरीकरण स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या २६ शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे पुण्याची वाहतूकसमस्या आणि त्यावरील उपाय मांडले.
वाहतूक पोलीस आणि काही स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पुण्याच्या विविध चौकांमधील, तसेच रस्त्यांवरील वाहतूकसमस्या प्रतिकृतींच्या माध्यमांतून मांडली. त्यावरील उपाययोजनाही या विद्यार्थ्यांनी या वेळी उपस्थितांना सांगितल्या. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आरएसपी शेडमध्ये या प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यासोबत खुल्या गटासाठीही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये १३ जणांनी सहभाग घेतला होता.
खुल्या गटातील स्पर्धेमध्ये बी. के. कॉलेज आॅफ आर्किटेक्टला प्रथम क्रमांकाचे, आर. व्ही. रास्ते या ७३ वर्षीय निवृत्त अभियत्यांना द्वितीय, तर एआरएआयला तृतीय पारितोषिक मिळाले. तर, शालेय स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
आगरकर स्कूलने पटकावला. द्वितीय क्रमांक बिना इंग्लिश स्कूल, तर तृतीय क्रमांक सिंधू विद्या भवनला मिळाला. दिल्ली पब्लिक स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, ससाणेनगरला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उपायुक्त सारंग आवाड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये महापालिकेची केवळ एकच शाळा सहभागी झाली होती. संत नामदेव प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नेहरू रस्त्यावरच्या पत्रकार वरुणराज भिडे (गिरीधर भवन) चौकाची वाहतूक समस्या प्रतिकृतीच्या माध्यमातून मांडली. या वेळी उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त कविता नेरकर, पोलीस निरीक्षक क्रांती पवार यांच्यासह सर्व वाहतूक विभागांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

अभियंता असलेल्या आर. व्ही. रास्ते या ७३ वर्षीय उत्साही ‘तरुणाने’ कर्वे रस्त्यावरच्या एसएनडीटी चौकातील पादचाऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एक प्रतिकृती सादर केली. सध्या चौकामध्ये अस्तित्वात असलेला लोखंडी पादचारी पूल अन्यत्र हलवून त्याठिकाणी भुयारी मार्ग केल्यास पादचाऱ्यांना अधिक सोपे जाईल. वयस्कर नागरिकांना जिना चढणे आणि उतरणे शक्य होत नसल्यामुळे भुयारी मार्गात स्वयंचलित जिना देण्याचा उपायही त्यांनी सुचवला. त्यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

वाहतूक पोलीस आणि काही स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पुण्याच्या विविध चौकांमधील, तसेच रस्त्यांवरील वाहतूकसमस्या प्रतिकृतींच्या माध्यमांतून मांडली.

या स्पर्धेमध्ये महापालिकेची केवळ एकच शाळा सहभागी झाली होती.

Web Title: Students find solutions for traffic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.