गुरुपाैर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना अनाेखी गुरुदक्षिणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 05:51 PM2018-07-27T17:51:25+5:302018-07-27T17:52:55+5:30
गुरुपाैर्णिमेनिमित्त भावे हायस्कूलमध्ये वेगळा उपक्रम राबविण्यात अाला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पुस्तके अापल्या शिक्षकांना भेट दिली.
पुणे : पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये गुरुपाैर्णिमा अनाेख्या पद्धतीने साजरी करण्यात अाली. नेहमी गुरुजण, वडीलधारे लाेक विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके देत असतात. परंतु गुरुपाैर्णिमेच्या निमित्ताने भावे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अापल्या शिक्षकांना पुस्तके भेट दिली. ही पुस्तके शाळेच्या ग्रंथालयात ठेवण्यात येणार असून ज्या विद्यार्थ्याला जे पुस्तक हवयं ते घेऊन वाचता येणार अाहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी अापल्या खाऊच्या पैशातून ही पुस्तके खरेदी केली अाहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनाेख्या गुरुदक्षिणेचे अाता सर्वत्र काैतुक हाेत अाहे.
राज्यभरात गुरुपाैर्णिमा अाज उत्साहात साजरी करण्यात येत अाहे. प्रत्येकजण अापल्या गुरुला अाजच्या दिवशी वंदन करुन त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल अाभार मानत अाहेत. या दिनाचे अाैचित्य साधून पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये एक अागळा वेगळा उपक्रम राबविण्यात अाला. मुलांमध्ये वाचनाची अावड निर्माण व्हावी, त्यांनी पुस्तकाशी मैत्री करावी, राष्ट्रीय पुरुषांच्या चरित्रातून बाेध घ्यावा अाणि यातून एक चांगला समाज निर्माण व्हावा या हेतून शिक्षकांना यंदा श्रीफळाएेवजी पुस्तके विद्यार्थ्यांकडून देण्याचा उपक्रम राबविण्यात अाला मुलांंनी दिलेली ही पुस्तके त्यांनाच वाचता येणार अाहेत. विद्यार्थ्यांनी ८००० रु. किमतीची ३५० पेक्षा जास्त पुस्तके शाळेला भेट दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश पुरंदरे उपस्थित हाेते.
विद्यार्थ्यांनी ही पुस्तके वाचून त्यांचे परिक्षण करण्याचा संकल्प यावेळी केला. विद्यार्थ्यांना शाळा समिती अध्यक्ष भालचंद्र पुरंदरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन शालेय मुख्याध्यापक भारमळ, उपमुख्याध्यापिका कोंढावळे, पर्यवेक्षक तांबे, व गद्रे यांनी केले.