विद्यार्थ्यांनी चिमण्यांना दिला अन्न, पाणी, निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:09 AM2021-03-22T04:09:32+5:302021-03-22T04:09:32+5:30

चिमण्यांची संख्या वाढावी त्यांना त्यांच्याच अधिवासात अन्न, पाणी आणि निवारा उपलब्ध व्हावा, चिमण्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी विद्यालयातील राष्ट्रीय ...

The students gave the sparrows food, water, shelter | विद्यार्थ्यांनी चिमण्यांना दिला अन्न, पाणी, निवारा

विद्यार्थ्यांनी चिमण्यांना दिला अन्न, पाणी, निवारा

Next

चिमण्यांची संख्या वाढावी त्यांना त्यांच्याच अधिवासात अन्न, पाणी आणि निवारा उपलब्ध व्हावा, चिमण्यांचे स्थलांतर होऊ नये यासाठी विद्यालयातील राष्ट्रीय हरीत सेनेतील विद्यार्थ्यांना आरुष कांबळे या विद्यार्थ्याने सुट्टीच्या कालावधीत चिमणीसाठी बनवलेल्या घरट्यांचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनी चिमण्यांना पाणी पिण्यासाठी व धान्य खाण्यासाठी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली भांडे आपल्या घराच्या गॅलरीत, अंगणात आणि परिसरातील झाडांवर बसवली.

यासाठी विद्यार्थ्यांना निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जुन्नरचे अध्यक्ष आणि राट्रीय हरित सेना प्रमुख संतोष कांबळे व कलाशिक्षक सत्यवान खंडाळे यांनी मार्गदर्शन केले .

हा पर्यावरण पूरक उपक्रम राबविल्याबदद्ल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, उपमुख्याध्यापक बबन डुंबरे तसेच परिसरातील पालक यांनी कौतुक केले.

चिमण्यांसाठी घरटी मिळालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी .

Web Title: The students gave the sparrows food, water, shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.