राज्य शासनाने सर्व पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे करावी यासाठी विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आलेल्या ऑनलाईन मोहिमेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही, मोहीम अजुन काही दिवस चालू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 07:26 PM2021-03-14T19:26:51+5:302021-03-14T19:58:36+5:30
दहा ते चौदा मार्च दरम्यान राबवण्यात आली होती मोहीम
आरोग्य विभागाच्या पद भरतीमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीद्वारे करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून "आता नाही तर कधी नाही'' ही ऑनलाईन हॅशस्टॅग मोहीम १० ते १४ मार्च दरम्यान सुरू केली होती. पण विद्यार्थ्यांचा मोहिमेला भरगोस प्रतिसाद नसल्याने ती अजून काही दिवस चालू राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
या ऑनलाइन मोहिमेत येत्या १४ तारखेपर्यंत सत्ताधारी व विरोधी परीक्षातील नेत्यांना एमपीएससीतर्फे सर्व पदांची भरती करावी , अशी मागणी आॅनलाइन साधनांच्या माध्यमातून केली जाणार होती. राज्य शासनाने यापूर्वी विविध पदांची भरती महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतली. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेसह अनेक विद्यार्थी संघटनांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेऊ नयेत,अशी मागणी केली. सर्वच क्षेत्रातून याबाबत मागणी होत असल्याने अखेर महापरीक्षा पोर्टलद्वारे या पुढे परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. परंतु,पुन्हा दुस-या खासगी कंपन्यांकडे परीक्षेची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे सर्व परीक्षा केवळ एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात,अशी मागणी पुन्हा एकदा समोर आली.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री जयंत पाटील,बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे , आदित्य ठाकरे, नाना पटोले, रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ई-मेल व ट्विटरद्वारे एसएमएस पाठवावेत,असे आव्हान स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी केली आहे.
एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बढे म्हणाले,
ऑनलाइन मोहिमेबरोबरच राज्यभरात आंदोलन चालू झाले होते. अशा वेळी विद्यार्थ्यांचे लक्ष आंदोलनात गुंतले होते. त्यामुळे मोहिमेला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच अजून काही दिवस ऑनलाइन मोहीम चालू ठेवली आहे.