परीक्षेचा पोरखेळ झाल्याची विद्यार्थ्यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:16 AM2021-03-13T04:16:33+5:302021-03-13T04:16:33+5:30

रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या उद्रेकामुळे मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत केविलवाणा खुलासा केला आहे. आमचा आता ठाकरे सरकारवर भारोसा राहिलेला नाही. ...

Students lament that the exam was childish | परीक्षेचा पोरखेळ झाल्याची विद्यार्थ्यांची खंत

परीक्षेचा पोरखेळ झाल्याची विद्यार्थ्यांची खंत

Next

रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या उद्रेकामुळे मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत केविलवाणा खुलासा केला आहे. आमचा आता ठाकरे सरकारवर भारोसा राहिलेला नाही. उद्या कोरोनाच्या नावाखाली लॉक डाऊन लावतील. यांचे काही सांगता येणार नाही. असा आरोप विद्यार्थांनी केला.

कोट

आठ दिवसांत कोरोना जाणार आहे का? मुख्यमंत्री काय बोलतात ते त्यांनाच समजत नाही. परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची या आधी कोरोना टेस्ट का? केली नाही.

- सुहास गायकवाड

कोट

यामुळे कोणता मोठा फरक पडणार आहे. कोणतेही नियोजन या सरकारचे नाही. केवळ तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे.

- विजय राठोड

कोट

विद्यार्थ्यांच्या उद्रेकामुळे आठ दिवसात परीक्षा घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुढच्या वेळेस परीक्षार्थींचा हिरमोड करू नये.

- अतुल मोरे

कोट

मुख्यमंत्र्यांनी लगेच फेसबुक लाईव्हने त्यांची बाजू मांडली. हे व्हायला नको होतं. अशा एकत्र जमावामुळे हा संसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे.

- विजय सुरवसे

कोट

प्रशासन आधी झोपले होते का, आधी ही पूर्व तयारी करता येत नव्हती का..? कशाला मानसिक त्रास दिलात आठ दिवसात काय करणार आहात.

-पवन चौधरी

मुख्यमंत्री जनतेतून निवडून आलेले नाहीत. ते कधी कोणा गरीबाच्या घरी गेले नाहीत. नोकरी मिळवण्यासाठी काय खस्ता खाव्या लागतात, याची जाणीव त्यांना नाही.

- चेतन मोरे

Web Title: Students lament that the exam was childish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.