विद्यार्थ्यांनी तयार केली शाळेच्या संस्थापकांची शिल्पे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 04:25 PM2018-04-10T16:25:58+5:302018-04-10T18:24:07+5:30
पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल तर्फे मुलांमधील कलागुण वाढीस लागावे, त्यांना अापली कला जाेपासता यावी या हेतून सर्जन हा उपक्रम राबविण्यात येताे. त्या अंतर्गत तब्बल 900 विद्यार्थ्यांनी शाळेच्या संस्थापकांची शिल्पे तयार केली.
पुणे : सगळीकडे इंग्रजी शाळांचं वारं वाहताना अापण सध्या पाहताेय. पालक वर्षाला लाखभर रुपये भरुन अापल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेत अाहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांशिवाय पुढे गत्यंतर नाही, असा समज समाजात रुढ हाेत असताना पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेने हा समज खाेडून काढत मराठी शाळा शैक्षणिक दृष्ठ्या किती सुदृढ अाहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केले अाहे. मुलांमधील कलेला प्राेत्साहन मिळावे या हेतूने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 'सर्जन' हा उपक्रम राबविण्यात येताे. या उपक्रमांतर्गत नुकताच विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक लाेकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गाेपाळ अागरकर, महादेव नामजाेशी यांची शिल्पे स्वतः तयार केली अाहेत. यातही एक दाेन नव्हे तर तब्बल 900 हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला हाेता.
शाळेचे मुख्याध्यापक नागेश माेने यांनी मुलांना शिक्षणाबराेबरच इतर कलांची अावड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुण जाेपासता यावेत तसेच अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा या उद्देशाने त्यांनी सर्जन या उपक्रमाची संकल्पना मांडली. याअंतर्गत चित्र, शिल्प, संगीत यांमध्ये अावड असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात अाले. डाॅ. मुकुंद राईलकर यांनी मुख्याध्यापकांना स्वतः तयार केलेल्या शाळेच्या संस्थापकांची शिल्पे भेट दिली हाेती. त्यावरुन अापल्या विद्यार्थ्यांना यांचं प्रशिक्षण मिळावं, तसेच स्वतः तयार केलेली शाळेच्या संस्थापकांची शिल्पे विद्यार्थ्यांच्या घरी असावीत या उद्देशाने संस्थापकांची शिल्पे तयार करण्याचा उपक्रम शाळेत राबविण्यात अाला. यात अाठवी ते दहावी इयत्तेतील 900 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. शाळेने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शिल्प तयार करण्याचे सर्व साहित्य दिले. मार्चमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात अाली हाेती. विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उत्फुर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे संस्थापकांची शिल्पे तयार करण्याची कल्पना विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर एकही विद्यार्थी नाही म्हंटला नाही. विद्यार्थ्यांनी मेहनत घेत शिल्पे तयार केली. तसेच ती शिल्पे एका बाॅक्समध्ये पॅक करुन त्यावर त्या संस्थापकाची माहिती देण्यात आली. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात तसेच सर्जन द्वारे मुलांमध्ये कलागुण जाेपासण्यात शाळेच्या सर्जन मंडळाचे प्रमुख सुरेश वरगंटीवार यांचा माेठा वाटा अाहे. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व चित्रकार मंगेश कुडले यांची या उपक्रमासाठी माेलाची मदत झाली.
मुख्याध्यापक नागेश माेने म्हणाले, मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलांची माहिती व्हावी, तसेच पुस्तकी ज्ञानाबराेबरच इतर कला विद्यार्थ्यांना जाेपासता याव्यात यासाठी सर्जन हा उपक्रम सुरु करण्यात अाला. मुलांना शिल्पकलेचा अनुभव मिळावा तसेच शाळेच्या संस्थापकांची विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शिल्पे त्यांच्या घरी असावीत या हेतून हा शिल्पे तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात अाला. त्याला विद्यार्थ्यांनी माेठा प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या वाटा निवडण्यासही मदत हाेणार अाहे.