विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करियर करा : अंकिता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:52+5:302021-09-10T04:16:52+5:30

कुरवली (ता. इंदापूर ) येथील श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा संचालित कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयात गुरुवारी जिल्हा परिषद ...

Students pursue a career in their field of interest: Ankita Patil | विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करियर करा : अंकिता पाटील

विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करियर करा : अंकिता पाटील

googlenewsNext

कुरवली (ता. इंदापूर ) येथील श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा संचालित कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयात गुरुवारी जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांच्या हस्ते दहावी व बारावी तसेच एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या आणि माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अंकिता पाटील बोलत होत्या. या वेळी कोरोना पार्श्वभूमीमध्ये या शाळेने टीम वर्कच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

स्पर्धा परीक्षेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल विशाल तुपे यांचा सन्मान करण्यात आला. अनुजा थोरात, राजेश सकट यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच बापूराव पांढरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश घोरपडे,शिक्षक आघाडीचे संतोष कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार, बाळासाहेब मोरे यांनी केले. आभार शिवाजी मोरे यांनी मानले.

०९ बारामती अंकिता

कुरवली येथे अंकिता पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Students pursue a career in their field of interest: Ankita Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.