विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे मिळाली

By admin | Published: July 17, 2015 03:47 AM2015-07-17T03:47:04+5:302015-07-17T03:47:04+5:30

अकरावी प्रवेशासाठी जमा केलेली मूळ कागदपत्र परत मिळविण्यासाठी शाळेकडे दहा हजार रुपये शुल्क भरा, असे सांगून विद्यार्थी व पालकांची अडवणूक करणाऱ्या दापोडी येथील

Students received original documents | विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे मिळाली

विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे मिळाली

Next

पुणे : अकरावी प्रवेशासाठी जमा केलेली मूळ कागदपत्र परत मिळविण्यासाठी शाळेकडे दहा हजार रुपये शुल्क भरा, असे सांगून विद्यार्थी व पालकांची अडवणूक करणाऱ्या दापोडी येथील न्यू मिलेनियम हायस्कूलने सर्व विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे परत केली आहेत. त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर विद्यार्थी व पालकांमध्ये झालेल्या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा दावा मिलेनियम हायस्कूल प्रशासनाने केला आहे.
अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळाल्यानंतर एका विद्यार्थ्याने ५० रुपये शुल्क भरून मिलेनियम हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु, शाळा घरापासून दूर असल्यामुळे विद्यार्थी व पालकांनी येथील प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कागदपत्र परत हवे असतील, तर १० हजार रुपये शुल्क भरा, असे या विद्यार्थ्याला हायस्कूलकडून सांगण्यात आले. ‘लोकमत’ने या घटनेवरील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करणाऱ्या शाळांचे चांगलेच धाबे दणाणले होते. मिलेनियम हायस्कूललाही जाग आली आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे परत दिली. विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव म्हणाले,‘‘अकरावी प्रवेश प्रकियेतून ५० रुपये शुल्क भरून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे द्यावीत. गैरसमजातून अथवा अनावधानानेसुद्धा कागदपत्र देण्यास नकार देऊ नये.
प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार १४ जैले रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर प्रवेश रद्द करणे शक्य नव्हते.त्यामुळे शाळेने ठरवून दिलेले शुल्क भरावे,असे पालकांना सुचविले, त्यांच्याकडून नियमबाह्य शुल्क मागितले नाही. त्यांनी प्रसार माध्यमांकडे कळविली.विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नव्हता,असे हायस्कूलतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Students received original documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.