संशोधन करून विद्यार्थ्यांनी देशासाठी योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:56+5:302021-06-16T04:15:56+5:30

पुणे : देशाने मला काय दिले याचा विचार न करता मी समाजाला काय दिले, या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी विचार ...

Students should contribute to the country by doing research | संशोधन करून विद्यार्थ्यांनी देशासाठी योगदान द्यावे

संशोधन करून विद्यार्थ्यांनी देशासाठी योगदान द्यावे

Next

पुणे : देशाने मला काय दिले याचा विचार न करता मी समाजाला काय दिले, या दृष्टिकोनातून सर्व विद्यार्थ्यांनी विचार करात नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून देशासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११८ व्या पदवीप्रदान समारंभात कोश्यारी बोलत होते. या कार्यक्रमास लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ऑनलाइन पद्धतीने तर विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात पार पडलेल्या या समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे आदी उपस्थित होते. यावेळी १ लाख ६१ हजार ५९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे देणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

कोरोनादरम्यान ऑनलाईन परीक्षा हे खूप मोठे आव्हान होते. मात्र, हे आव्हान ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्वीकारले व यशस्वी करून दाखवले त्याप्रमाणे तुम्हीदेखील बदलता काळ स्वीकारत पुढे चलावे, असा संदेश यावेळी कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम व योजनांचा आढावा सर्वांपुढे मांडला. तसेच पुढील १० वर्षांच्या वाटचालीची पायाभरणी चार वर्षांत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

--------

सुमित्रा महाजन म्हणाल्या, शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरीत पॅकेजचा विचार करतो. परंतु, त्याबरोबर आपण समाजाचे देणे लागतो, याचाही विचार असावा. प्रत्येकाने समाजाप्रतीची संवेदनशीलता कायम जपली पाहिजे.

----------------

उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. तसेच नवे शैक्षणिक धोरण आत्मसात करण्यातही विद्यापीठ पुढे आहे. कोरोना काळात ‘एनएसएस’ च्या विद्यार्थ्यांनी खूप मोठे समाजकार्य केले याचे मला कौतुक आहे.

---------

फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या समारंभात वेदांत मुंदडा या विद्यार्थ्याला ‘द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, डॉ. शंकर दयाळ शर्मा सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. सन २०१९-२० चा ‘बेस्ट स्टुडंट’चा मानही वेदांतने पटकावला.

Web Title: Students should contribute to the country by doing research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.