विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य सांभाळावे- संदीप पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:29 PM2018-08-28T23:29:34+5:302018-08-28T23:29:55+5:30

वयात येत असतानाच नकळत हातून चुका होऊन गुन्हे दाखल होतात; त्यामुळे भविष्यात नोकरीसाठी अडचणी निर्माण होतात. याची जाणीव ठेवून चारित्र्य खराब झाल्यास ती भरून न निघणारी गोष्ट आहे.

Students should take care of their character - Sandeep Pakhala | विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य सांभाळावे- संदीप पखाले

विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य सांभाळावे- संदीप पखाले

Next

सांगवी : वयात येत असतानाच नकळत हातून चुका होऊन गुन्हे दाखल होतात; त्यामुळे भविष्यात नोकरीसाठी अडचणी निर्माण होतात. याची जाणीव ठेवून चारित्र्य खराब झाल्यास ती भरून न निघणारी गोष्ट आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य सांभाळावे, असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी व्यक्त केले.

निर्भया पथक, बारामती विभागाच्या वतीने शिवनगर विद्याप्रसारक मंडळ महाविद्यालय माळेगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पखाले बोलत होते. ते म्हणाले, की अत्याचार झाल्यास मुलींनी कुटुंबाला कलंक लागेल याची भीती बाजूला ठेवून मुलींनी निर्भीड होऊन पुढे येण्याची गरज आहे. एखादी गंभीर बाब टोकाला जाण्याअगोदर व्यक्त होणे गरजेचे असून, पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांच्या बाजूने कायदे असले, तरी त्याचा गैरफायदा घेऊ नये, असे मत निर्भया पथकाच्या अमृता भोईटे यांनी व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, विश्वस्त संग्राम काटे, माळेगाव दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड, ग्राहक संरक्षण समिती सदस्य प्रमोद जाधव, महिला पोलीस नाईक अमृता भोईटे, पोलीस नाईक अर्चना बनसोडे, प्राचार्य रामचंद्र पवार, विजय वाबळे, निखिल जाधव, नितीन चव्हाण, शिवराज जाधव, प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

काका-काकी, महिला सुरक्षितता समितीची स्थापना करणार
४रोडरोमिओंच्या छेडछाडीबाबत निर्भया पेटीबरोबरच आता प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थिनी सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘काका-काकी’ उपक्रम राबवून एक महिला पोलीस व एक पुरुष पोलीस यांचे सर्व विद्यार्थिनींना मोबाईल क्रमांक देऊन रोडरोमिओंवर वचक बसवणार आहे. २५ महिलांची महिला सुरक्षितता समिती नेमून अत्याचार झालेल्या महिलेनी त्या ठिकाणी तक्रार करून तिथेच वाद मिटविण्याच्या प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ही समिती काम करणार आहे.

गुप्त कॅमेऱ्याद्वारे गुंड प्रवृत्ती थांबवणार...
महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या टवाळखोरांकडून मुलींना वारंवार टाँट मारणे, छेडछाड यांबाबत एखाद्या मुलीने तक्रार केल्यास निर्भया पथक कारवाईसाठी साधा वेश परिधान करून गुप्त कॅमेºयाच्या साह्याने रोडरोमिओंचा प्रकार आपल्या कॅमेºयात कैद करून छेड काढणाºया मुलांच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलांचा सक्षम पुराव्यासह प्रताप दाखवून चांगलाच धडा शिकवून समुपदेशन करण्यात येते.

Web Title: Students should take care of their character - Sandeep Pakhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.