विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी: भगवान पोखरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:26+5:302021-01-25T04:11:26+5:30

ते म्हणाले की सन्माना मागील हेतू समाजातील गुणवंत, कर्तृत्ववान लोकांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक करुन अधिक प्रगती गाठण्यासाठी त्यांना ...

Students should walk with a specific goal in mind: Bhagwan Pokharkar | विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी: भगवान पोखरकर

विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी: भगवान पोखरकर

Next

ते म्हणाले की सन्माना मागील हेतू समाजातील गुणवंत, कर्तृत्ववान लोकांचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक करुन अधिक प्रगती गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करणे, समाजात गुणवंत लोकांचे कौतुक होतांना फारसे दिसत नाही. पालकांच्या समोर आपल्या पाल्याचा सत्कार, सन्मान होतांना पाहून त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. समाजातील बुद्धीवंत या कार्यक्रमामुळे समाजा समोर येतात. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत गुणवत्तेत आम्हीसुद्धा मागे नाही हे दाखवत नायफड येथील सुमित आढारी, प्रांजली ठोकळ व सुप्रिया शिंदे या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक धनराज अचवलकर यांचा सन्मान करण्यात आला.. सेवानिवृत्त झालेले झालेले शिक्षक बबन तिटकारे ,रामचंद्र तिटकारे ,रघुनाथ कावळे यांचाही सन्मान करण्यात आला .

या कार्य या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती धारु गवारी, सदस्य विठ्ठल वनघरे, दूध संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे विस्ताराधिकारी जीवन कोकणे, केंद्रप्रमुख भरत लोखंडे, एकनाथ लांघी, तानाजी म्हाळूंगकर, काळुराम ठाकूर, सुरेशराव नाईकरे , रामचंद्र शिंगाडे सर, नवनाथ ढोकले ,खेड तालुका शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते . केंद्रातील सर्व शिक्षक , ग्रामसेवक लकारे ,मारुती शिंदे, व नवनिर्वाचित सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल शिंदे यांनी केले.

नायफड ( ता खेड ) विध्यार्थी सत्कार व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सन्मान करताना सभापती भगवान पोखरकर व मान्यवर.

Web Title: Students should walk with a specific goal in mind: Bhagwan Pokharkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.