विद्यार्थी पाससाठी ताटकळत

By admin | Published: December 24, 2016 06:37 AM2016-12-24T06:37:11+5:302016-12-24T06:37:11+5:30

येथील एसटी बस स्थानकात पास काढण्यासाठी एकच खिडकी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. विद्यार्थ्यांना रांगेत ताटकळत

Students shouting for passes | विद्यार्थी पाससाठी ताटकळत

विद्यार्थी पाससाठी ताटकळत

Next

मंचर : येथील एसटी बस स्थानकात पास काढण्यासाठी एकच खिडकी असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. विद्यार्थ्यांना रांगेत ताटकळत थांबून पास काढावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने पास काढता यावेत, अशी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.मंचर येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातून विद्यार्थी येतात. हे विद्यार्थी बहुधा एसटी बसनेच ये-जा करतात. त्यासाठी एसटीचा पास काढून, मग एसटीने प्रवास केला जातो. सिटीचा प्रवास करण्यापेक्षा पास काढण्याचे काम अवघड होऊन बसले आहे. मंचर एसटी बस स्थानकात पास काढण्याची व्यवस्था आहे. मात्र, एकाच खिडकितून पास दिले जात असल्याने ते काम वेळेत होत नाही.
विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी अक्षरश: रांगा लावाव्या लागतात. शाळेची वेळ पाळून विद्यार्थ्यांना हे करावे लागते. त्यामुळे अनेकदा शैक्षणिक नुकसान झालेले पाहावयास मिळते. दोन रांगा लावून काम सुरू करण्यात आले. कामकाजात काहीशी सुधारणा झाल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना पास देताना तो तत्परतेने देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.(वार्ताहर)

Web Title: Students shouting for passes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.