विद्यार्थ्यांनी केली हजारो लिटर पाण्याची बचत

By admin | Published: April 2, 2016 03:33 AM2016-04-02T03:33:54+5:302016-04-02T03:33:54+5:30

पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे शाळेला दररोज टॅँकरने हजार लिटर पाणी मागवावे लागत होते. याला फाटा देत शाळेने मुलांच्या वॉटरबॅगमधील वाया जाणारे पाणी एका टाकीत साठवले

Students spend thousands of liters of water | विद्यार्थ्यांनी केली हजारो लिटर पाण्याची बचत

विद्यार्थ्यांनी केली हजारो लिटर पाण्याची बचत

Next

निगडी : पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे शाळेला दररोज टॅँकरने हजार लिटर पाणी मागवावे लागत होते. याला फाटा देत शाळेने मुलांच्या वॉटरबॅगमधील वाया जाणारे पाणी एका टाकीत साठवले. एका वर्षात शाळेने तब्बल एक लाख लिटर पाणी साठवून त्याचा वापर शाळेतील झाडे, स्वच्छतागृहे व साफसफाईसाठी केला जात आहे.
निगडीतील सिटी प्राइड स्कूल पाणीबचतीचा हा अभिनव उपक्रम गेली दोन वर्षे उपक्रम राबवीत आहे. दररोज मुलांच्या बॉटलमधील शिल्लक राहिलेले पाणी मुले घरी जाताना शाळा सुटल्यानंतर एका बादलीत जमा करतात. मुलांच्या उंचीएवढी बादली मुलांच्या समोर ठेवली जाते. बादली भरल्यानंतर ते पाणी टाकीत टाकले जाते. हा उपक्रम दररोज राबविला जातो.
पाणीबचतीमुळे पूर्ण शाळेला सध्या पाणीपुरवठा होत आहे. यापूर्वी मुलांना वापरण्यासाठी लागणारे पाणी टॅँकरने येत होते, तेदेखील बंद झाले. शाळेच्या स्वच्छतागृहांना देखील हेच पाणी वापरले जाते. शाळेच्या आवारातील झाडांना साचलेल्या पाण्यातून पुरवठा केला जातोे.
गतवर्षी शाळेने या माध्यमातून एक लाख लिटर पाणी बचत केले आहे. शाळेची विद्यार्थिसंख्या १६५० आहे. बहुतेक विद्यार्थ्याच्या बाटलीत रोज सुमारे २०० एमएल पाणी शिल्लक राहते. यासाठी शाळेत प्रत्येक ठिकाणी पाणी बचतीसाठीचे फलक लावले आहेत. मुलांमध्ये वेळोवेळी पाणी बचतीसाठी जनजागृती केली आहे. शाळेतील नळांच्या टॅबमधून होणारी पाणीगळती शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर त्वरित नळांची दुरुस्ती करुन घेतली. त्यातूनही शाळेने पाणी बचत केले. (वार्ताहर)

दररोज जवळपास पाचशे लिटर पाणी बचत होते. असा उपक्रम वर्षभर राबविला जातो. पाणी गळतीसाठी वेळेतच देखभाल दुरुस्तीची कामे होणे आवश्यक आहेत. सर्व नागरिकांनी यासाठी सतर्क व्हावे. देश-विदेशांतून आज या छोट्याशा उपक्रमाचे कौतुक होत आहे. शाळेने मुलांच्या मनात पहिल्यापासूनच पाणी बचत कशी करावी, हे रूजवल्याने मुलांना अवघड जात नाही.
- माया सावंत, मुख्याध्यापिका,
सिटी प्राइड स्कूल

Web Title: Students spend thousands of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.