फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुळशी तालुक्यातील तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 22:25 IST2024-10-20T22:24:45+5:302024-10-20T22:25:23+5:30
पर्यटनासाठी आले असता घडली दुर्दैवी घटना

फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुळशी तालुक्यातील तलावात बुडून मृत्यू
पिरंगुट : फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मुळशी तालुक्यातील खांबोली येथील तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार (दिनांक 20) रोजी घडली असुन ओजस आनंद कठापुरकर (वय २२, रा. प्राधिकरण निगडी, पुणे) आणि राज संभाजी पाटील (वय २२, रा. अमळनेर जळगाव) अशी या दोन मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकणारे आदेश राजेंद्र भिडे,सुमेध सतीश जोशी,प्रशांत संभाजी आरगडे, तेजस्विनी साहेबराव पवार, निधी सत्यनारायण हळदंडकर, तृप्ती चंद्रकांत देशमुख,चैतन्या जयंत कांबळे,ओजस आनंद कठापुरकर आणि राज संभाजी पाटील हे विध्यार्थी रविवारी कॉलेजला सुट्टी असल्यामुळे पर्यटनासाठी मुळशी तालुक्यांमध्ये आले होते तेव्हा ते सकाळी नऊ वाजण्या च्या सुमारास खांबोली येथील तलावाजवळ फिरण्यासाठी आले असता ते सर्व जण तलावाच्या पाण्यात उतरले होते त्यावेळी कदाचित पाण्याचा व गाळाचा अंदाज न आल्याने ओजस कठापुरकर आणि राज पाटील हे गाळात अडकून बसले त्यावेळी उर्वरित विध्यार्थी हे पाण्यातून लागलीच बाहेर पडले परंतु या दोघांना पाण्यातून बाहेर पडता आले नाही
त्यावेळी इतरांनी ओजस कठापुरकर याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत खुप उशीर झाला होता कारण त्या विध्यार्थ्यांला पाण्यातुन बाहेर काढून पुढील उपचारासाठी तेथील स्थानिक डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले होते.
तर राज पाटील या विध्यार्थ्यांला देखील वाचविण्यात इतर विद्यार्थ्यांना अपयश आले त्यामुळे बराच वेळ झाला तरी त्याचा मृत्यू देह देखील आढळून आला नाही शेवटी अग्निशामक दलाच्या जवानानी शोध घेतला असता राज पाटील या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दुर्दैवी रित्या मृत्य पावलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह हे शवविच्छेदन करण्यासाठी पौड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले
या दरम्यान पौड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी घटनास्थळाला भेट देऊन तेथील पाहणी केली होती तर पोलिस हवालादार रविद्र नागटिळक,ईश्वर काळे,अमोल सूर्यवंशी,अग्नीशामकचे जवान व ग्रामस्थ यांनी या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली तर या संपूर्ण घटनेचा पुढील तपास हा पौड पोलिस स्टेशनंच्या वतीने सुरु आहे.