बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:37 PM2021-08-02T20:37:36+5:302021-08-02T20:39:48+5:30

बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; संबंधित तक्रारींचे होणार निवारण

Students will be able to object to the results of class XII | बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार

बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येणार; निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार

Next

पुणे: राज्य मंडळाकडून मंगळवारी जाहीर केल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवता येणार असून विभागीय मंडळ स्थरावरून संबंधित तक्रारींचे निवारण केले जाणार आहे,असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रसिध्द केल्या जाणा-या बारावीच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.परीक्षेचा निकाल सुधारित मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर झाल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्यांच्या निराकरणासाठी विभागीय मंडळ स्तरावर व्यवस्था निर्माण काण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक विभागीय मंडळ स्थरावर तक्रार निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहसचिव प्रिया शिंदे पुणे विभागातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण करणार आहेत.

राज्य मंडळाने यासाठी स्वतंत्र अर्ज उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांना विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरून हा अर्ज डाऊनलोड करून त्यावर तक्रार किंवा आक्षेप नोंदवाता येतील. संबंधित तक्रार निवारण अधिकारी कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसात विद्यार्थ्यांचा अर्ज निकाली काढून तक्रारीचे उत्तर पत्र किंवा ई-मेलद्वारे देतील. उत्तराबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित विभागीय अध्यक्ष किंवा सचिवांशी संपर्क साधावा,असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

बारावीचा आज निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी (दि.3) दुपारी 4 वाजता जाहीर केला जाणार आहे. दहावीच्या निकालाप्रमाणे बारावीच्या निकालात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी पाच संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे 2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावी, अकरावी आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही.या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी एक संधी उपलब्ध राहिल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 निकाल पाहण्यासााठी संकेतस्थळ

1) https://hscresult.11thadmission.org.in
2) https://msbshse.co.in
3) hscresult.mkcl.org
4) mahresult.nic.in.
5) http://lokmat.news18.com

Web Title: Students will be able to object to the results of class XII

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.