आकाशवाणीवरून मिळणार विद्यार्थ्यंना इंग्रजीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:10 AM2021-01-22T04:10:05+5:302021-01-22T04:10:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर: जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील इयत्ता ४ ते ८ वीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आकाशवाणी केंद्रावरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर: जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील इयत्ता ४ ते ८ वीपर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे आकाशवाणी केंद्रावरून इंग्रजीचे धडे मिळणार असून शिक्षण विभागाने आम्ही इंग्रजी शिकतो, हा उपक्रम दि.२१ जानेवारीपासून सुरू केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
सेंटर फाँर लर्निगं रिसोर्सस या संस्थेने हे इंग्रजी धडे तयार केले आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावर मीडियम वेव्ह ७९२ केएच २ वरून २६ मार्च पर्यत प्रसारित करण्यात येणार आहे. या प्रसारणाची रेंज ३०० किलोमीटर परीसरात अंतरापर्यंत असून देखील ज्या विद्यार्थ्यांकडे आकाशवाणी ऐकण्याची सुविधा नाही अशासाठी जिल्हा परिषदेच्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
४ ते ८ वीपर्यंत विद्यार्थ्यांना २६ जानेवारी, १९ फेब्रुवारी आणि ११ मार्च हे दिवस वगळून मंगळवार, बुधवार सकाळी १०.३० ते ११ तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार या दिवशी सकाळी १०.४५ ते ११ या वेळेत धडे शिकवले जाणार आहे. एकूण इंग्रजी विषयाचे ८४ धडे आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
खेड तालुक्यातील पालकांनी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या उपक्रमात आपला पाल्याला सहभागी करण्यास प्रोत्साहन देण्याचे आवाहन जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती भगवान पोखरकर उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी केले आहे.