विद्यार्थ्यांना मिळणार अंतराळातील सॅटेलाइट, रोबोटिक्सचे धडे; इस्त्रोकडून महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रयोगशाळा

By श्रीकिशन काळे | Published: April 22, 2023 04:38 PM2023-04-22T16:38:52+5:302023-04-22T16:40:01+5:30

या ठिकाणी सॅटेलाइट, ॲप्लिकेशन ड्रोन, रोबोटिक्स आदींचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत...

Students will get lessons in space satellites, robotics; Isro's first laboratory in Maharashtra | विद्यार्थ्यांना मिळणार अंतराळातील सॅटेलाइट, रोबोटिक्सचे धडे; इस्त्रोकडून महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रयोगशाळा

विद्यार्थ्यांना मिळणार अंतराळातील सॅटेलाइट, रोबोटिक्सचे धडे; इस्त्रोकडून महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रयोगशाळा

googlenewsNext

पुणे : अंतराळामधील गोष्टींचे निरीक्षण करायचे असेल, स्पेस लॅब रॉकेट सायन्स अनुभवायचे असेल तर आता ते विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. कारण इस्त्रोच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुण्याजवळ पहिली स्पेस एज्युकेशन प्रयोगशाळा सुरू केली आहे. या ठिकाणी सॅटेलाइट, ॲप्लिकेशन ड्रोन, रोबोटिक्स आदींचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. 
 
पुण्याजवळील मुळशी येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये इस्रोच्या स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत कलाम माशेलकर स्पेस अँड इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली असून, या सेंटरचे उद्घाटन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुळशी येथील ही अंतराळ प्रयोगशाळा भारतातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली प्रयोगशाळा असून यामध्ये स्पेस लॅब रॉकेट सायन्स, सॅटेलाइट, एप्लिकेशन्स ड्रोन, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी, थ्रीडी प्रिंटिंग, एअरक्राफ्ट्स इत्यादीसारख्या नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर विविध प्रकारचे कार्यक्रम केले जाणार असून लॅबची स्थापना व्योमिका स्पेस अकादमीने इस्रोच्या स्पेस ट्यूटरच्या दृष्टीकोनातून केली आहे. या प्रसंगी इस्रोचे जेष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ टी. एन. सुरेशकुमार, शाळेचे संस्थापक कृष्णा जी भिलारे, संचालक कुणाल भिलारे, शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापिका, यशस्विनी भिलारे, गोविंद यादव, कुलगुरू आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रतिक मुणगेकर, प्राचार्या रेणू पाटील, डॉ. पी. के. रजपूत, रवींद्र रसाळ, शिक्षण अधिकारी के. डी. भुजबळ उपस्थित होते.

डॉ. माशेलकरांनी मुलांशी भारतातील अनेक मान्यवरांच्या जडणघडणी विषयी दिलखुला संवाद साधला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झालेली स्वतःची जडणघडण त्याचप्रमाणे भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम, आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची उदाहरणे देऊन शिक्षण हेच भविष्य असल्याने भरपूर शिका पण नुसती घोकमपट्टी न करता शोधा, निरीक्षण करा, पहा आणि आत्मसात करण्याचा संदेश ही दिला.

या प्रयोगशाळेत चांद्रयान 1, मंगळयान 1 उपग्रह मॉडेलसह SLV 3, ASLV, PSLV, GSLV D1, GSLV MK III, SSLV सारखे ISRO अंतराळ प्रक्षेपकांचे स्केल मॉडेल्सचा अभ्यास इथे होईल. प्रयोगशाळेत दोन दुर्बिणी बसवण्यात आल्या असून, त्याद्वारे अंतराळात घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय रोबोट किट, लाईट फॉलोइंग किट, ब्लूटूथ कंट्रोल रोबोट्स, क्वाडकॉप्टर ड्रोन इत्यादी गोष्टी प्रयोगशाळेत पाहता येतील.

Web Title: Students will get lessons in space satellites, robotics; Isro's first laboratory in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.