विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही :राज्य मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 08:07 PM2018-03-04T20:07:06+5:302018-03-04T20:07:06+5:30

पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

 Students will not have any educational loss : State Board | विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही :राज्य मंडळ

विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही :राज्य मंडळ

Next
ठळक मुद्दे बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याया परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत

दहावी-बारावी उत्तरपत्रिका जळीत प्रकरण
पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत, तरी त्यांनी निश्चिंत होऊन पुढील पेपर द्यावेत असे आवाहन काळे यांनी केले आहे.   
शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयांचे पेपर झाले. त्याच्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका गट साधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. रविवारी सायंकाळी अचानक याठिकाणी आग लागून बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल राज्य मंडळाकडून घेण्यात आली आहे. 
 याठिकाणी जाणीवपूर्वक आग लावून उत्तरपत्रिका जाळण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिका सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापार्श्वभुमीवर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या मागच्या कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढे काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय राज्य मंडळाकडून घेतला जाईल, असे शंकुतला काळे यांनी सांगितले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हित जपण्याला सध्या प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
बीडमधील वसंत महाविद्यालय (केज), सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय (केज), रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय (केज), पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, (नांदूरघाट) आदी परीक्षा केंद्रांमधील बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीतील विद्यार्थ्यांच्या केंद्रांची निश्चित माहिती समजू शकलेली नाही. 

Web Title:  Students will not have any educational loss : State Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.