नियोजनपूर्वक अभ्यास करा

By admin | Published: June 27, 2017 07:54 AM2017-06-27T07:54:21+5:302017-06-27T07:54:21+5:30

विद्यार्थ्यांनी अकरावी अभ्यासक्रम व जेईई, नीट यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षांचा ताण न घेता योग्य नियोजन करून अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन करिअर तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी केले.

Study carefully | नियोजनपूर्वक अभ्यास करा

नियोजनपूर्वक अभ्यास करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विद्यार्थ्यांनी अकरावी अभ्यासक्रम व जेईई, नीट यासारख्या प्रवेशपूर्व परीक्षांचा ताण न घेता योग्य नियोजन करून अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन करिअर तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी केले.
लोकमत व कपिल भरणे क्लासेसतर्फे आयोजित हडपसर येथील साधना विद्यालय येथे आयोजित अकरावी सायन्सला प्रवेश घेतलेल्या / घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेत वेलणकर बोलत होते. वेलणकर म्हणाले की, विज्ञान शाखेतील विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर क्षेत्रात पारंपरिक शाखेत करिअर करण्याचा विचार करतात.
मात्र , या अभ्यासक्रमामध्ये अनेक नावीन्यपूर्ण शाखा उपलब्ध झाल्या आहेत. या वेळी कपिल भरणे क्लासेसचे संचालक कपिल भरणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केले.
भरणे म्हणाले, काही कोचिंग क्लासेसकडून जेईई, नीट, सीईटी या पूर्वपरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे, मात्र विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. नियोजनबद्ध अभ्यास केल्यास चांगले गुण मिळवता येतात. या मार्गदर्शन कार्यशाळेला हडपसर व परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांना विवेक वेलणकर व कपिल भरणे यांनी उत्तरे देखील दिल्याने विद्यार्थी व पालकांच्या मनातील शंका दूर झाल्या. मार्गदर्शन कार्यशाळेचे सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले.

Web Title: Study carefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.