पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने अभ्यास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:30+5:302021-01-25T04:12:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांचे सत्यशोधक विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे ...

Study Center in the name of Prabodhankar at Pune University | पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने अभ्यास केंद्र

पुणे विद्यापीठात प्रबोधनकारांच्या नावाने अभ्यास केंद्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रबोधनकार ठाकरे यांचे सत्यशोधक विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अभ्यास केंद्र सुरू करण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवात सामंत यांनी बालगंधर्व कलादालनातील छायाचित्र-व्यंगचित्र तसेच प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या साहित्यसंपदेची पाहणी केली. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुणे विद्यापीठात अभ्यास केंद्र आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधनकारांविषयी माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात प्रबोधनकारांवर धडा समाविष्ट करावा, अशी मागणी सुनील महाजन यांनी केली. विद्यापीठात अभ्यास केंद्र सुरू करण्याच्या मागणीस सामंत यांनी तत्काळ मान्यता देत या संदर्भात कुलगुरूंशी आज चर्चा झाली आहे. अभ्यासकेेंद्रासाठी समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. प्रबोधनकार ठाकरे यांच्यावरील धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करून निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आश्वासनही सामंत यांनी दिले.

शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे उपस्थित होते. प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होण्यासाठी रत्नागिरीत अशा प्रकारचा महोत्सव सुरू करण्याची जबाबदारी मी घेतो. प्रबोधन महोत्सव महाराष्ट्रातील किमान दहा मोठ्या शहरांमध्ये व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सामंत म्हणाले, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत संकुल उभारण्याची कल्पना आहे. तसेच प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी पुण्यातही लवकरच टीचर्स अकॅडमी सुरू करणार असून याची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात सुरू होईल.

सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन, निकिता मोघे, हरिश केंची, किरण साळी यांनी स्वागत केले. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Study Center in the name of Prabodhankar at Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.