उज्ज्वल यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:11+5:302020-12-02T04:10:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ‘ सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते. तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ‘ सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते. तसेच कठोर परिश्रमामुळे प्रावीण्य प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित, विज्ञान यांसह इतर विषयात चांगली प्रगती करायची असेल त्यांनी एकलव्याप्रमाणे एकनिष्ठतेने आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण अभ्यास करावा’,असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सुपरमाईंड फाउंडेशन संस्थेतर्फे राज्यातील दहावीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी गणित, विज्ञान या विषयांत अधिक गुण कसे मिळवावेत या विषयावर आयोजित ऑनलाईन परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी भगतसिंह कोश्यारी बोलत होते. परिसंवादात माजी आमदार मेधा कुलकर्णी, फाउंडेशनच्या संचालिका मंजूषा वैद्य, शालेय शिक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. सुलभा विधाते, डॉ. जयश्री अत्रे, दया कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. या परिसंवादात पुणे, नगर, औरंगाबाद, सातारा, बीड आदी जिल्ह्यातील सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले.
कोश्यारी म्हणाले की, कोरोनावर लस येण्यासाठी काही काळ जाणार आहे, अशावेळी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहिले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साधने नाहीत. त्यांच्यापर्यंतसुध्दा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक पोहोचले पाहिजे. विज्ञान व गणित यांसारख्या कठीण समजल्या जाणाऱ्या विषयांसंदर्भात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.