वास्तुशास्त्रात पंचतत्त्वांचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:23+5:302021-07-03T04:08:23+5:30

आपले शरीर पंचातत्त्वाने बनले आहे, त्याचबरोबर ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves व कॉस्मिक एनर्जी इत्यादी सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर व मनावर ...

The study of the five principles in architecture | वास्तुशास्त्रात पंचतत्त्वांचा अभ्यास

वास्तुशास्त्रात पंचतत्त्वांचा अभ्यास

googlenewsNext

आपले शरीर पंचातत्त्वाने बनले आहे, त्याचबरोबर ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves व कॉस्मिक एनर्जी इत्यादी सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. म्हणूनच एखाद्याच्या घरी गेलो तर तिथे खूप प्रसन्न शांत आणि रिलॅक्स वाटते. तर एखाद्या ठिकाणी खूप अस्वस्थ, अशांत वाटते हे आपण अनुभवतो. पण, कारण लक्षात येत नाही. कारण, असते तिथली सकारात्मक किंवा नकारात्मक वास्तुरचना या सर्व गोष्टींचा अभ्यास, म्हणजेच वास्तुशास्त्र.

Every person needs a family to be happy and every family need the home which can keep them happy

आणि वास्तुशास्त्र हेच करते, तुमचे घर इतके सकारात्मक करते की तिथेच तुम्हाला स्वर्गाचा अनुभव होतो. पौराणिक कथेनुसार इंद्रप्रस्थमध्ये महासभा होती व वास्तुदोष होता असे म्हटले जाते व त्यामुळे महाभारत घडले. म्हणजेच आपल्या वास्तूच्या मुख्य दाराची दिशा, आपला मास्टर बेडरूम, देवघराची योग्य जागा, स्वयंपाक घर कुठे आहे, टॉयलेट योग्य दिशेत आहे का, जड भाग हलका भाग कुठल्या दिशेत आहे, पंचतत्त्वाचा असोसिएटेड दिशा आहेत तिथे योग्य का अयोग्य गोष्टी आहेत असे अनेक गोष्टींचा अभ्यास करून गृहरचना करणे म्हणजेच वास्तुशास्त्र.

या बेसिक गोष्टींबरोबर वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच बारिक-बारिक गोष्टींचा अभ्यास केला जातो. उदाहरण तुम्ही झोपताना शक्यतो दक्षिणेकडे डोकं असावं. कारण, पृथ्वीचा चुंबकीय प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे असतो म्हणजेच आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपलं तर आपण निसर्गाच्या एकरूप असतो, म्हणून शांत झोप लागते. अशा छोट्या छोट्य गोष्टींनी बराच फरक पडतो, ते जाणून घ्या व अमलात आणल्याने तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच जाणवेल.

समजा, वास्तु घेण्याआधी आपण आपल्या वास्तूचे परीक्षण नाही केले, तरी काळजी करू नका. काही साधे सोपे बदल रचनेमध्ये करून, तर काही यंत्र पिरॅमिड इत्यादी पद्धतीने आपण आपली वास्तू जास्तीत जास्त सकारात्मक नक्कीच करू शकतो. बऱ्याच वेळा किरकोळ बदल करून लोकांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. वास्तुतज्ज्ञांकडे गेलो म्हणजे गरज नसताना खर्च करावा लागेल, अशी शंका येऊ देऊ नका. सध्या फ्लॅट म्हटलं की, 100% वास्तू कम्प्लेंट असं नाहीच म्हणून थोडेफार रेमेडिजची गरज पडते. पण त्या खर्चापेक्षा रिझल्टचा फायदा खूपच जास्त असतो. आता एक उदाहरण- बराच वेळ अग्नेय दिशेची ऊर्जा कमी वाटत असेल किंवा परिपूर्ण नसेल तर तेथील ऊर्जा पूर्ण करायला साधा दिवा लावूनही आपण ते पूर्ण करून शकतो. थोडक्यात, आपल्या खिशाला परवडणारे साधे उपायही असतातच. फक्त काही वेळा वास्तुदोष खूप जास्त असतो, त्या वेळा मात्र वास्तूमध्ये मोठे बदल किंवा वास्तू बदलण्याची गरज पडते. पण ते खूप कमी वेळा होते.

या शास्त्राच्या साह्याने आपल्या घराची सकारात्मकता वाढवून नकारात्मकता कमीत कमी करणे यासाठी आपल्या वास्तूची तपासणी स्वतः करा व गरजेनुसार वास्तुतज्ज्ञ यांचा योग्य सल्ला घेऊन आपले घर स्वर्गरुपी करा.

- संगीता कोतकर

Web Title: The study of the five principles in architecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.