भोर तालुक्यात अभ्यास गटाची निर्मिती टप्या टप्याने: सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:48+5:302020-12-11T04:27:48+5:30
उञौली ( ता. भोर ) येथील उच्च प्राथमिक शाळेपासून अभ्यास गटाची निर्मिती झाली असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी आश्विनी सोनवणे ...
उञौली ( ता. भोर ) येथील उच्च प्राथमिक शाळेपासून अभ्यास गटाची निर्मिती झाली असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी आश्विनी सोनवणे बोलत होत्या.
यावेळी उपशिक्षणाधिकारी अंजिक्य खरात,केंद्रप्रमुख रामचंद्र कुमकर,मुख्याध्यापक सदाशिव गलांडे ,अशोक शिळीमकर, विजया झगडे ,सुलभाताई थोपटे, पंडीत गोळे ,सुदाम ओंबळे , लक्ष्मण दामगुडे ,दत्ताञय कंक, मीना रणनवरे,अंकुश परूळेकर ,लक्ष्मण दामगुडे ,रमेश कुंभार,अनंत गोसावी,आशा भोमे,सुनिता जाधव,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक वर्ग उपस्थित होते.
आश्विनी सोनवणे (केळकर) म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. ते अधिक प्रभावीपणे व्हावे यासाठी शालेय स्तरावर चार ते पाच विद्यार्थ्यांच्या अभ्यास गटांची निर्मिती करून शिक्षकांनी वाडी, वस्तीवर जाऊन शालेय आवारात शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून आणि विद्यार्थी व पालकांच्या परवानगीने कृती वर आधारित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे.
फोटो
उञौली ( ता. भोर ) येथे अभ्यास गट निर्मितीत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे