‘त्या’ विद्यार्थ्यांचा अभ्यास अपुराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 06:17 AM2017-10-29T06:17:34+5:302017-10-29T06:17:43+5:30

लांबलेल्या प्रवेश फे-यांमुळे इयत्ता अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही

The study of 'those' students is insufficient | ‘त्या’ विद्यार्थ्यांचा अभ्यास अपुराच

‘त्या’ विद्यार्थ्यांचा अभ्यास अपुराच

googlenewsNext

पुणे : लांबलेल्या प्रवेश फे-यांमुळे इयत्ता अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सुरू राहिली. या कालावधीत एकूण नऊ फेºया घेण्यात आल्या असून, एकूण ९२ हजार ३५० प्रवेश क्षमतेपैकी ७१ हजार ५५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानुसार पुणे व पिंपरी- चिंचवडमधील महाविद्यालयांमध्ये एकूण २१ हजार २९५ जागा रिक्त राहिल्या आहेत. जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे. प्रवेशासाठी इच्छुक असलेला एकही विद्यार्थी प्रवेशापासूून वंचित राहू नये, ही भूमिका घेऊन समितीकडून प्रक्रिया लांबविण्यात आली.
अकरावीचे वर्ग दि. २६ जुलैपासून सुरू झाले, तोपर्यंत केवळ दोनच फेºया झाल्या होत्या. या फेºयांमध्ये केवळ २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता; तसेच बहुतेक मोठ्या महाविद्यालयांची संख्या त्यामध्ये जास्त होती. या प्रक्रियेतील नियमित चौथी फेरी आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात संपली. तोपर्यंत केवळ ५० ते ५५ टक्के प्रवेश झाले होते. त्यानंतर दोन विशेष फेºया व ‘प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार तीन फेºया घेण्यात आल्या. सहावी फेरी ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहिली. या फेरीत १ हजार ९११ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर सातवी फेरी म्हणजे दुसºया विशेष फेरीपर्यंत एकूण ६९ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. ही फेरी ११ सप्टेंबरपर्यंत सुरू होती. सहाव्या फेरीनंतर झालेल्या तीन फेºयांत जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यापैकी जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांचा दीड महिन्याचा अभ्यासक्रम बुडाला. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, याबाबत कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. महाविद्यालयांनीच या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेण्याचे फर्मान समितीने सोडले होते; पण अनेक महाविद्यालयांना जादा वर्ग घेणे शक्य झालेले नाही.

अकरावी प्रवेश : आॅडिट समिती कागदावर
1 इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेचे आॅडिट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या आतापर्यंत केवळ दोनच बैठका झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय
प्रवेशप्रक्रियेच्या प्रवेशाच्या नऊ फेºया झाल्या असल्या, तरी आॅडिट समितीच्या बैठकांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे पुढे आले आहे. मागील काही वर्षांत अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. प्रवेश फेºयांची संख्या वाढविणे, कोटा प्रवेश समर्पित न करणे, प्रवेशातील अनियमितता यांसह विविध तक्रारी ‘सिस्कॉम’ या संस्थेने केल्या होत्या. 2प्रवेशप्रक्रियेचा अभ्यास करून, संस्थेने दर वर्षी या
प्रवेशप्रक्रियेचे आॅडिट करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने राज्यात विभागनिहाय आॅडिट समित्या स्थापन केल्या. प्रवेशप्रक्रियेदरम्यान विविध बाबींवर चर्चा करून, त्यातील त्रुटी दूर करणे हा या समितीचा उद्देश आहे. त्यामुळे समितीच्या सातत्याने बैठका होणे अपेक्षित होते; मात्र जून महिन्यापासून प्रत्यक्षात केवळ दोनच बैठका झाल्या आहेत. पालक प्रतिनिधी म्हणून पुणे विभागीय आॅडिट समितीतील सदस्य व सिस्कॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर म्हणाले, ‘प्रवेशप्रक्रियेदरम्यान आॅडिट समितीची पहिल्या फेरीवेळी एक आणि तिसºया फेºयापूर्वी दुसरी बैठक झाली. त्यानंतर आजपर्यंत प्रशासनाकडून बैठक घेण्यात आलेली नाही. दोन्ही बैठकांमध्ये विशेष असे काहीच झाले नाही. 3नेमके आॅडिट करायचे कशाचे, याबाबत शासनाचे आदेशच नाहीत, असे अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर पुढील फेºयांमध्ये झालेले प्रवेश शंकास्पद आहेत. त्यामुळे अधिकाºयांकडून आॅडिट समितीचे बैठक घेतली जात नाही, असा आरोप धारणकर यांनी केला. राज्यात सर्वच विभागात ही स्थिती असण्याची शक्यता आहे. आता सिस्कॉमकडूनच अकरावी प्रवेशाबाबत अभ्यास करून, लवकरच त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्यातील त्रुटी, उपाय योजना याचा समावेश त्यामध्ये केला जाईल.

Web Title: The study of 'those' students is insufficient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.