स्टंटबाजी बेतली जीवावर : नदी ओलांडताना तरुण गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 09:54 PM2019-07-30T21:54:02+5:302019-07-30T21:57:21+5:30
खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा या गावी नवीन पुलावरुन घरी जाताना पाण्याचा अंदाज आल्याने न आल्याने तरुण वाहून गेल्याची घटना मंगळवारी घटना घडली.
पुणे : खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा या गावी नवीन पुलावरुन घरी जाताना पाण्याचा अंदाज आल्याने न आल्याने तरुण वाहून गेल्याची घटना मंगळवारी घटना घडली. आझाद नारायण गाडे (वय३८ ) रा. खरपुडी खुर्द असे या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आझाद नारायण गाडे हे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कामावरून घरी येत होते. खरपुडी येथे बंधाऱ्याच्या लगत नवीन झालेल्या पुल झाला,त्यावरून तो जात होते. स्टंटबाजी करत तो वाहत्या पाण्यातुन येत होता. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्याच्या ओढ्या वाहून गेले वाहून गेले. ग्रामस्थांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते सापडला नाही. काल ही त्याने या पुलावरून येताना अशीच स्टंटबाजी केली होती. मंगळवारी दिवसभर पाऊस असल्याने ओढया ओढ्या नाल्यांना पूर आले होते. तसेच चासकमान धरणातून पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे नदीला मोठा पूर आला होता. अशावेळी केलेली स्टंटबाजी तरुणाच्या जीवावर बेतली आहे.