मुख्यमंत्र्यांकडूनच स्टंटबाजी

By admin | Published: April 25, 2016 01:00 AM2016-04-25T01:00:47+5:302016-04-25T01:00:47+5:30

सध्या मंदिरप्रवेशावरुन चालू असलेल्या वादावर अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत.

Stunts from Chief Ministers | मुख्यमंत्र्यांकडूनच स्टंटबाजी

मुख्यमंत्र्यांकडूनच स्टंटबाजी

Next


पुणे : सध्या मंदिरप्रवेशावरुन चालू असलेल्या वादावर अनेक उलटसुलट चर्चा चालू आहेत. यामध्ये तृप्ती देसाई, गुप्ते यांसारख्या महिला स्टंटबाजी करत असल्याचे बोलले जात असताना कोणतीही ठोस भूमिका न घेतलेले मुख्यमंत्री खरी स्टंटबाजी करत आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केला.
बलराज सहानी व साहीर लुधियानवी फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात पुरस्कार सोहळ््याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अभिनेता ओंकार गोवर्धन याला बलराज सहानी पुरस्काराने तर लेखक संजय पवार यांना कैफी आझमी पुरस्काराने बाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर फाऊंडेशनचे सचिव सुरेश टीळेकर, दिग्दर्शक धमर्कीर्ती सुमंत, अलका देशपांडे व अनिकेत बाळ उपस्थित होते.
बाळ म्हणाल्या, ‘‘महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत शासन आणि मुख्यमंत्री कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत ही खेदाची बाब आहे. तर या अधिकारासाठी लढणाऱ्या महिलांना अशाप्रकारे मार खावा लागतो ही वाईट गोष्ट आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशाचा कायदा ५६ सालीच झालेला असून त्यासाठी भांडण्याची आवश्यकता नसून या कायद्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.’’ बाईच्या पाळीचा शास्त्रीय आधार अपवित्र मानला जात असेल तर त्यामध्ये काही तथ्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या प्रत्येकाच्या तोंडाला कुलूपे लावली जात असून दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि कन्हैया ही त्याची उदाहरणे आहेत. फुले, शाहू आणि आंबेडकरांची नावे घेऊन मोठमोठ्या बाता केल्या जातात, मात्र कोणत्याही गोष्टीचा प्रत्यक्ष अवलंब होताना दिसत नाही.
कलाकारांना स्वत:ची स्वतंत्र विचारसरणी असणे आणि आपले विचार उघडपणे मान्य करणे यात काहीही गैर नसल्याचे सांगत पवार यांनी मनोगतात म्हटले.
आपल्या व्यवस्थेत कोणत्याही गोष्टीचा विचार हा खोलवर केला जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आव्हानांना सामोरे जाण्यात आपण अनेकदा कमी पडलो असलो तरीही आता सक्रीय होण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओंकार गोवर्धन याने आपला नाट्यक्षेत्रातील प्रवास सांगत असताना कोणत्या ना कोणत्या चळवळीशी जोडले जाणे गरजेचे असल्याचेही सांगितले. यावेळी धर्मकीर्ती सुमंत यांनीही ओंकार गोवर्धन याच्याविषयी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या.
या वेळी अलका देशपांडे व अनिकेत बाळ यांचाही सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Stunts from Chief Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.