पाण्याच्या टाकीसाठी उपजिल्हा रुग्णालयाची जागा देण्याचा प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:46+5:302021-03-20T04:10:46+5:30
दौंड नगर परिषदेची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या अंतर्गत अडीच लिटर साठवण क्षमता असणारी उंचावर ...
दौंड नगर परिषदेची नवीन नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या अंतर्गत अडीच लिटर साठवण क्षमता असणारी उंचावर टाकी उभारायची आहे. त्यासाठी ४०० चौरस मीटरच्या जागेची आवश्यक्ता आहे. या जागेची मागणी नगर परिषदेने उपजिल्हा रुग्णालयाकडे केलेली आहे. त्यासंदर्भात वैशाली नागवडे यांनी मुंबई येथे मंत्रालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान, राजेश टोपे म्हणाले, पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. रुग्णांना कुठल्याही परिस्थितीत पाण्यावाचून वंचित ठेवू शकत नाही. रुग्णालयाच्या जागेत पाण्याची टाकी उभारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर लवकरच चर्चा करण्यात येईल. त्याचबरोबर हा विषय निकाली काढला जाईल असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालयास सातत्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु, रुग्णांचे भवितव्य टँकरवर किती दिवस अवलंबून राहणार आहे. तेव्हा पाण्याच्या टाकीसाठी जागा मिळाल्यास नवीन पाणी पुरवठा योजने अंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठ्याची जलवाहिनी रुग्णालयास मिळेल. परिणामी रुग्णालय कायमस्वरुपी टँकरमुक्त होईल.
वैशाली नागवडे
अध्यक्षा महिला राष्ट्रवादी
१९ दौंड टोपे भेट
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे तालुका युवा अध्यक्ष विकास खळदकर, वैशाली नागवडे.