पोलीस उपनिरीक्षकपद; प्रतीक्षा यादी लावा
By admin | Published: October 3, 2015 01:07 AM2015-10-03T01:07:32+5:302015-10-03T01:07:32+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये ७१४ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी घेतलेल्या परीक्षेनंतर ६५२ उमेदवार प्रशिक्षणास रुजू झाले; मात्र उर्वरित ६२ रिक्त पदांसाठी आयोगाने अद्यापही प्रतीक्षा यादी लावलेली नाही
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१३ मध्ये ७१४ पोलीस उपनिरीक्षकपदासाठी घेतलेल्या परीक्षेनंतर ६५२ उमेदवार प्रशिक्षणास रुजू झाले; मात्र उर्वरित ६२ रिक्त पदांसाठी आयोगाने अद्यापही प्रतीक्षा यादी लावलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही प्रतीक्षा यादी लावावी, यासाठी २०१३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी
मागणी केली आहे. नव्याने ६२ पदे भरण्यासाठी शासनाचा येणारा खर्च व वेळ तर वाचलेच, शिवाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकणार आहे.
दरम्यान, स्पर्धा परीक्षेच्या अध्यादेशानुसार, काही उमेदवार वैयक्तिक व इतर कारणांमुळे नियक्ती स्वीकारत नाहीत. त्यामुळे ती पदे
रिक्त राहतात. रिक्त राहिलेल्या पदांसाठी नव्याने निवड प्रक्रिया राबवावी लागते व त्याचा प्रशासनावर आर्थिक व प्रशासकीय ताण पडत असल्याने गुणवत्ता यादीवरील
पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादी लावली जाऊ शकते. त्याअनुषंगाने
८ आॅगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या बैठकीमध्ये प्रतीक्षा यादी लावणार, असे घोषित केले होते.
मात्र अद्यापही ही प्रतिक्षा यादी लावली नसल्याने यासंबंधी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा यादी लावण्याची मागणी केली आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले आहे. (प्रतिनिधी)पोलीस उपनिरीक्षकपदासाठी २०१३ च्या परीक्षेनंतर मार्च २०१५ मध्ये त्याचा निकाल लागला. यासाठी विद्यार्थ्यांचे अडीच वर्ष गेले आहेत. दरम्यान, इतर परीक्षांचाही अभ्यास करता आले नाही. काही जण वयोमर्यादेच्या काठावर आहेत. त्यामुळे गुणवत्ता असूनही केवळ प्रतीक्षा यादी नसल्याने अधिकच अडचण झाली आहे. विद्यार्थ्यांचेही वय व वेळ वाचू शकेल, त्यामुळे तातडीने प्रतीक्षा यादी लावावी.
- सुजित गुंजाळ,
स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी